Raju Shetti On Pawar: दीड महिन्यांत असं काय घडलं ? राजू शेट्टींचा शरद पवारांना खोचक सवाल

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Raju Shetti On Sharad Pawar
Raju Shetti On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या मुद्यावरून व अजित पवारांच्या गुप्त भेटीबाबत सवाल करत गेल्या दीड महिन्यांत असं काय घडलं ?, या माझ्या शंकेचे निरसन करा, असा सवाल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असून त्यांची दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे. एवढंच नाही तर शरद पवार दोन दिवस कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. यावेळी ते दिग्गजांच्या गाठीभेटी व राजकीय खलबतेही होणार आहेत.

Raju Shetti On Sharad Pawar
Kolhapur Sharad Pawar Politics: पवारांच्या सभेला मुश्रीफ कार्यकर्ते पाठवणार? नेमकं काय म्हणाले मुश्रीफ

या पार्श्वभूमीवरच राजू शेट्टी यांनी पवारांच्या राजकीय भूमिकेवर शंका घेत अजितदादांचा सरकारमधील सहभाग आणि पुण्यात झालेली गुप्त भेट यादरम्यान दीड महिन्यांत नेमकं काय घडले, या आमच्या शंकेचे निरसन पवारांनी करावे, असे विधान केले आहे. त्यामुळे आता पवार राजू शेट्टी यांच्या प्रश्नावर काय बोलणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

राजू शेट्टी हे शरद पवार यांच्या प्रत्येक राजकीय भूमिकेवर आसूड ओढतात. पवार यांची राजकीय भूमिका काय असू शकेल? त्या भूमिकेचा गेम कोणावर होणार? हे कोणालाच कळले नाही. हाच धागा पकडत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर पवार यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करत शेट्टी यांनी शेलक्या शब्दात टीका केली होती.

Raju Shetti On Sharad Pawar
Ajit Pawar Sabha News : बीडचा विकास बारामतीसारखा करणार का ? सभेआधीच बॅनरने केली अजितदादांची कोंडी..

अजित पवार यांच्या निर्णयामागे शरद पवार यांचाच हात असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण खुद्द शरद पवार यांनी आपली भूमिका वेगळी आहे. जातीत तेढ निर्माण करणाऱ्यासोबत मी कधी जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. पण तरीही शेट्टी यांनी शरद पवार उजव्या हाताने जे करतात ते डाव्या हाताला कळत नाही, अशी त्यांची राजकारण करण्याची परंपरा आहे. त्यांची हीच प्रतिमा आज त्यांना राजकारणात त्रासदायक ठरते, असा निशाणा साधला होता.

यानंतर आता पक्ष फुटीनंतर दीड महिन्याच्या कालावधीत असे काय घडले?, या माझ्या शंकेचे निरसन शरद पवार हे कोल्हापुरातील सभेत करतील, असे विधान शेट्टींनी केले आहे. याबाबतची प्रतिक्रिया शेट्टींनी गुरुवारी कोल्हापुरात दिली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com