Raju Shetti News : कारखानदार लोकसभा-विधानसभेला पैसा उधळतील ; राजू शेट्टींनी उपसले आंदोलनाचे हत्यार

Sugar Factory News : जर कारखानदारांनी पैसे नाही दिले, तर कारखाना ठेवणार नाही.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

Raju Shetti In Kolhapur : गेल्या वर्षीची साखरेच्या वाढीव किमतीतील रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जर आता शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले, तर हेच कारखानदार लोकसभा-विधानसभा निवडणुकीला पैसे उधळतील. जर कारखानदारांनी पैसे नाही दिले, तर कारखाना ठेवणार नाही. असा दम शेट्टी यांनी कोल्हापुरात (Kolhapur) दिला.

साखर कारखान्याच्या कर्जासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या (BJP) कारखानदाराकडून वैयक्तिक खाजगी मालमत्तेचे हमीपत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या निर्णयाची शेट्टी यांनी पाठराखण केली. भाजपच्या साखर कारखानदारकडून अजित पवारांनी हमी पत्र का मागू नयेत ? कारखाना काढताना भरमसाठ कर्ज उचलली जातात. मात्र, कारखाना विकताना कवडीमोल भावाला विकला जातो. अशी प्रतिक्रिया देत पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Raju Shetti
Kolhapur Sharad Pawar Politics: पवारांच्या सभेला मुश्रीफ कार्यकर्ते पाठवणार? नेमकं काय म्हणाले मुश्रीफ

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. 2021-22 ची साखरेच्या वाढीव किंमतीचे 200 रुपये अजून ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. तसेच यंदा शेतकऱ्यांना अंतिम बिलाला 400 रुपये मिळाले पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Raju Shetti
Raju Shetti On Pawar: दीड महिन्यांत असं काय घडलं ? राजू शेट्टींचा शरद पवारांना खोचक सवाल

हंगाम सुरु होईपर्यंत सर्व कारखान्यानी डिजिटल वजन काटे बसवले पाहिजेत. दसऱ्यापर्यंत ही शिल्लक देय द्यावी, अन्यथा हंगाम सुरू करू देणार नाही. असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, वरील मागण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com