Chhatrapati Sambhajiraje News: संभाजीराजेंचा गौतमी पाटीलला काल पाठिंबा आज यू टर्न; म्हणाले, अशा 'कले'ला..

Chhatrapati Sambhajiraje on Gautami Patil: गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा मागे घेत संभाजीराजे छत्रपती यांनी यू टर्न घेतला आहे.
Chhatrapati Sambhajiraje on Gautami Patil
Chhatrapati Sambhajiraje on Gautami PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajiraje News: नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या अडनावावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. तर गौतमीने पाटील आडनाव लावू नये, अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली. या मुद्यांवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य करत कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, असं म्हटलं.

कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, मी या मताचा आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली होती. मात्र, आता गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा मागे घेत संभाजीराजे छत्रपती यांनी यू टर्न घेतला आहे.

Chhatrapati Sambhajiraje on Gautami Patil
Chhatarapati Sambhajiraje News: मी तसलं काही केलं नाही, त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही : संभाजीराजेंनी ठणकावले

संभाजीराजे छत्रपती यांनी आपण दिलेल्या प्रतिक्रियावर स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये "महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण", असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे संभाजीराजे छत्रपती यांचं ट्वीट?

"काल एका पत्रकाराने एका महिलेचा 'कलाकार' असा उल्लेख करत तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत, असं म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र, आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची 'कला' मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण!, असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com