Solapur NCP SP : लॉजमध्ये घुसून महिलेचा विनयभंग; राष्ट्रवादीच्या माजी महापौराची पक्षातून हकालपट्टी

Manohar Sapate Expelled from NCP SP : मनोहर सपाटे यांच्या विरोधात त्यांच्याच शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या एका मुख्याध्यापिकेने बलात्काराची तक्रार दिली होती. त्यावरून सपाटेंविरुद्धात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी ते अनेक दिवस फरार झाले होते.
Manohar Sapate
Manohar SapateSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 June : विनयभंगाची तक्रार दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूरचे माजी महापौर मनाहेर सपाटे यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. विनयभंगाची तक्रार आणि सोशल मीडियात त्यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षाची जनसामन्यांमधील प्रतिमा डागळली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सपाटे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या सपाटेंची आणखी कोंडी झाली आहे.

संबंधित महिलेने सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली होती, त्यानुसार मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सपाटे यांच्याविरुद्ध यापूर्वीही त्यांच्या संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. पुन्हा तसाच गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल झाला आहे.

संबंधित महिला ही न्यायालयीन कामासाठी पुण्यातून सोलापूरला (Solapur) आली होती. त्या वेळी ती सोलापूर शहरातील मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या लकी चौक परिसरातील शिवपार्वती लॉजमध्ये 14 जून रोजी उतरली होती. संबंधित महिलेच्या रूममध्ये 17 जून रोजी मध्यरात्री बारानंतर सपाटे हे गेले, त्या वेळी त्यांनी छेडछाड करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिला ही मनोहर सपाटे यांना ‘मला सोडा, तुम्ही माझ्या वडिलासारखे आहोत’ अशी विनवणी केली. त्या वेळी ‘तू वेश्या आहेस, आज मी तुला सोडणार नाही’, असे म्हणत दमदाटी केली. तसेच, माझ्याविरोधात तक्रार दिली किंवा कोणाला बोलली तरी मला काही फरक पडत नाही. माझे वय जास्त असल्याने मला जामीन मिळतो, असे म्हणत त्यांनी लज्जास्पद वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Manohar Sapate
Udayanraje Bhosale :खासदार उदयनराजेंच्या ड्रीम प्राेजेक्टला केंद्राचा हिरवा कंदील; आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठरणार महत्वपूर्ण

मनोहर सपाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहे, त्यामुळे माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तसेच, शिवपार्वती लॉज हा त्यांच्याच मालकीचा असल्याने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करतील, म्हणून मी त्यांचे 24 जून रोजी स्टिंग ऑपरेशन केले, तो व्हिडिओ पाेलिसांना दाखवला, त्यानंतर सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.

दरम्यान, मनोहर सपाटे यांच्या विरोधात त्यांच्या शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या एका मुख्याध्यापिकेने बलात्काराची तक्रार दिली होती. त्यावरून सपाटेंविरुद्धात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी ते अनेक दिवस फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका या प्रकरणी तरी काय असणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Manohar Sapate
Vasant More Vs Yogesh Tilekar : भाजप आमदारांना नडले ठाकरेंचे 'तात्या'! आता थेट 30 सहकाऱ्यांवर गुन्हा

मनोहर सपाटे यांंनी केलेल्या कृत्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे, तसेच जनमानसांतील प्रतिमा डागळली आहे. सपाटे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पक्षाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com