
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रखडलेल्या काम संदर्भात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी कात्रज चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी भाजप आमदार योगेश टिळेकर कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते.
त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्याने शाब्दिक वाद झाले. यानंतर आज थेट वसंत मोरे यांच्यासह त्यांच्या 25 ते 30 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याचे समोर आला आहे.
पुणे (PUNE) महापालिकेच्या आयुक्तांनी शुक्रवारी महापालिकेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासंदर्भात पाहणी दौरा केला होता. यावेळी आमदार योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पालिकेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम पाहण्यासाठी आमदार आणि आयुक्त येणार असल्याचे पाहून शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वसंत मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करत 'स्टंटबाजी बंद करा', 'कात्रज कोंढवा रस्ता' पूर्ण करा, असे फलक दर्शवले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना नागाची प्रतिकृती सुद्धा उपहासात्मक भेट दिली.
यादरम्यान योगेश टिळेकर आणि वसंत मोरे आमने-सामने आल्याचे पाहिला मिळालं, या दोघांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. कात्रज कोंढवा रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून वसंत मोरे यांनी आमदारांना काही प्रश्न केले. आमदारांनी त्याच पद्धतीने उत्तर दिले. मात्र त्यातून वसंत मोरे यांचा समाधान झाल्याचं पाहायला मिळालं नाही.
आमदारांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वसंत मोरे यांचा आंदोलन सुरू होतं. त्यानंतर आज विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना नेते वसंत मोरे आणि त्यांच्या 25 ते 30 साथीदाराविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) कात्रज बायपास मुख्य चौकातील जागा हस्तांतरण प्रक्रिया, त्याचबरोबर उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी कात्रज मेन बायपास चौकातील गुगळे प्लॉटची जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली. आता उधळपट्टी करूनही अनेक प्रश्न अजूनही अधांतरीच आहे.
2) अंबिका हॉटेल ते बालवडकर बिल्डिंग येथील 1972 सालापासून अस्तित्वात असणारा व 'दुष्काळी रस्ता' या नावाने परिचित असलेला वहिवाटीचा रस्ता जागा हस्तांतरित केल्यानंतर मालकाने उरलेला जो प्लॉट रहिवासी झोन केला आहे त्यामध्ये विलिन केल्याचे समजते. जी जागा हस्तांतरित करून पालिकेकडून श्री गुगळे यांनी मोबदला घेतला त्या जागेच्या हद्दीची पारदर्शकता अजूनही आलेली नाही. त्याची मूळ खरेदी खते मागणी करूनही मिळालेली नाहीत.
3) कात्रज मेन चौकातील रस्त्याचे सुरु असलेल्या कामाच्या वेळेची मर्यादा डीएमआर कन्स्ट्रक्शनकडून पाळली जात नसल्याने, ट्रॅफिक सिग्नल बसवणे व पालिका प्रशासनाशी संबंधित इतर कामे आणि वाहतूक पोलिसांचे वाहतूक नियोजन यांचा समन्वय होत नसल्याकारणाने हा चौक नागरिकांसाठी कधी खुला होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
4) बायपास चौकातील वळवण्यात आलेली वाहतूक पूर्ववत केल्यानंतर वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. वाहतूक विभाग आणि डी एम आर कन्स्ट्रक्शन यांनी दबावाला बळी पडत वाहतूक पूर्ववत केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
5) जेएसपीएम बिल्डिंग समोरील कलवर्टचे काम खूप संथ गतीने सुरु आहे. ज्यावर डीएमआर कन्स्ट्रक्शन आणि पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रण नसून आपापसात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कात्रज आणि परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनामागील भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.