Ramesh Kadam News : अजितदादांवर आरोप करणाऱ्या बोरवणकर १२ वर्षे गप्प का होत्या? रमेश कदमांचा सवाल

Meera Borwankar Book : बोरवणकर यांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले आहेत.
Ramesh Kadam News
Ramesh Kadam News Sarkarnama

Solapur News : पु्ण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. जेलमधून सुटून आलेले माजी आमदार रमेश कदम यांनी बोरवणकर यांच्यावर टीका केली.

"बोरवणकर यांना आरोपच करायचे होते, तर त्या मागच्या 12 वर्षांपासून गप्प का होत्या. हा फक्त त्यांच्या पुस्तकाला प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आहे. त्याचबरोबर बोरवणकर यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्याच पोलिस खात्यात नाराजी होती. अजित पवार हे स्वतःच्या खात्याव्यतिरिक्त दुसऱ्याच्या खात्यात हस्तक्षेप करत नाहीत. त्यावेळेस आर. आर. पाटील हे गृहमंत्री होते. बोरवणकर यांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Kadam News
Lalit Patil Latest News : 'ससून'मधून मी पळालो नाही, मला पळवलं गेले ! ललित पाटीलचा मोठा गौप्यस्फोट

येरवडा येथील पोलिस खात्याची तीन एकर जागा एका बिल्डरला देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दादांनी दबाव आणल्याचा खळबळजनक दावा अजित पवारांचे नाव न घेता त्यावेळच्या पुण्याच्या पोलिस आय़ुक्त आणि माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर-चढ्ढा यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

'लिलावाची एक प्रक्रिया झाली आहे. एक बिल्डर येतो आणि जागेची मागणी करतो. त्यावेळी पुणे पोलिसांची प्रतिनिधी म्हणून मी ती जागा बिल्डरला देण्यास नकार दिला. ती पोलिसांची जागा आहे आणि त्यावेळी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त होते. त्यांना कार्यालय नव्हतं. पोलिसांच्या घरांची मोठी समस्या आहे, तर ती पोलिसांची जागा पोलिसांकडेच राहू द्या, असं मी म्हटलं होतं. पण हे एक सामान्य प्रकरण आहे. आणि येरवड्याच्या त्या जागेवरून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय', असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला. बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

Ramesh Kadam News
Ajit Pawar News : एकनाथ खडसे, गिरीश महाजनांच्या नावांनंतर 'रावेर'वर आता अजितदादा गटाचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com