Suresh Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; साडीने घेतला गळफास, सांगलीत खळबळ

NCP Leader Suresh Patil Suicide Attempt: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी सोमवार (7 एप्रिल) गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
Suresh Patil
Suresh PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी सोमवार (7 एप्रिल) गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उष:काल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत.

सुरेश पाटील यांचे गेल्या 3 दशकांहून सांगलीच्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे नाव आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. 2008 मध्ये जयंत पाटील यांनी महाआघाडीची मोट बांधत सांगली महानगरपालिकेत काँग्रेसचा पराभव करत सत्तांतर घडविले होते. त्यात सुरेश पाटील आघाडीवर होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडूनच विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

Suresh Patil
Kedar Jadhav: पुण्यातील मराठमोळ्या माजी क्रिकेटरची राजकीय मैदानावर एन्ट्री; BJP मध्ये करणार प्रवेश

गतवर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला होता. पण तेव्हापासून ते काही कारणांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अलिप्त होते. पण त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी उपस्थिती लावली होती.

Suresh Patil
Deenanath Hospital : दीनानाथ आंदोलन प्रकरण; कुलकर्णी-घाटे वाद दिल्ली दरबारी, 'डॅमेज कंट्रोल'साठी केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील नेत्यांची पळापळ

मात्र सोमवारी सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांना तातडीने ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरा रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com