Solapur Congress : सोलापुरात काँग्रेसला झटका; सुशीलकुमार शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याने पक्ष सोडला!

Chandrakant Dayma Resigned Congress Party : काँग्रेस सेवा दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय चंद्रकांत दायमा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दायमा यांनी पक्ष सोडणे, हा सोलापूर काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.
Chandrakant Dayma
Chandrakant Dayma Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 February : काँग्रेस सेवा दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय चंद्रकांत दायमा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दायमा यांनी पक्ष सोडणे, हा सोलापूर काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. दायमा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून राज्यात चंद्रकांत दायमा यांची ओळख होती. काँग्रेस सेवादलाच्या (Congress Seva Dal) माध्यमातून त्यांनी सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षबांधणीचे काम केले होते. मात्र, काँग्रेसकडून सेवादलाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे दायमा हे व्यथित होते. त्यांनी अनेक वर्षे सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने केले होते.

सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षसंघटनेच्या बांधणीत चंद्रकांत दायमाचा महत्वाचा वाटा आहे. सोलापूर (Solapur) महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यातही मोठे योगदान राहिलेले आहे. काँग्रेसमधील अनेक महत्वपूर्ण पदावर चंद्रकांत दायमा यांनी काम केलेले आहे. विशेषतः काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे पक्षाचे काम केलेले आहे.

Chandrakant Dayma
Shivsena-BJP Cold War : शिवसेना-भाजपमध्ये अखेर जुंपलीच; फडणवीसांच्या निकटवर्तीयास शिंदेंचा मंत्री देणार टशन

चंद्रकांत दायमा म्हणाले, मी काँग्रेस पक्षात मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबर काम केले आहे. मात्र, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाला माझ्यासारख्या निष्ठावंतांची कदर नाही. अनेक जुन्या नेत्यांना काँग्रेस पक्षात आता महत्व राहिलेले नाही. मी माझे संपूर्ण जीवन काँग्रेस पक्षासाठी दिलेले आहे, तरीही पक्षात आमची कदर केली जात नाही.

काँग्रेस पक्षात आत निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान राहिलेले नाही. जुन्या जाणत्या लोकांची पार्टीकडून आता कदर केली जात नाही, त्यामुळे आमच्यासारख्या निष्ठावंतांना दुःख होते आहे. काँग्रेस पक्षाला आता भविष्य राहिलेले नाही. आता लोकांची महायुतीला पसंती आहे, त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Chandrakant Dayma
Shivsena Vs Neelam Gorhe : गोऱ्हेंचा आरोप जिव्हारी, शिवसेनेचे साहित्य महामंडळास खरमरीत पत्र, 'सदस्यांना 50 लाख, अध्यक्षांना मर्सिडीज...'

माझ्यासोबत राज्यातील सेवादलाचे सर्व जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत. विशेषतः सोलापुरातल पदाधिकारी मोठया संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत धक्का बसलेल्या काँग्रेसला आणखी धक्के बसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com