Akkalkot Politic's : अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जून पाटील, शिवानंद पाटलांना धक्का; आनंद तानवडे, कल्याणशेट्टींच्या काकूंचा ZPचा मार्ग मोकळा!

ZP Election 2025 : आरक्षण सोडतीत अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील व माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना धक्का बसला असून, मंगलताई कल्याणशेट्टी व आनंद तानवडे यांना दिलासा मिळाला आहे.
Mallikarjun Patil- Shivanand Patil
Mallikarjun Patil- Shivanand Patil Sarkarnama
Published on
Updated on
  1. आरक्षणामुळे राजकीय उलथापालथ:
    अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला असून, त्यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने राजकीय समीकरण बदलले आहे.

  2. काहींसाठी अडथळे, काहींसाठी सुवर्णसंधी:
    माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील आणि माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना फटका बसला असताना, आनंद तानवडे आणि मंगलताई कल्याणशेट्टी यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

  3. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव:
    पंचायत समिती सभापतिपद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने या प्रवर्गातील इच्छुकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे, तर इतरांना मतदारसंघ बदलावे लागतील.

Akkalkot, 14 October : अक्कलकोट पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये अनेक मातब्बरांना धक्का बसला असून, त्यांचे पंचायत समितीचे गण आरक्षित झालेले आहेत. तसेच तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट असून आरक्षणामुळे दिग्गजांना मतदारसंघ गमवावे लागणार आहेत. आरक्षणाचा फटका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना बसला आहे. दुसरीकडे, आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या काकू मंगलताई कल्याणशेट्टी, भाजपचे जिल्हा परिषदेतील माजी गटनेते आनंद तानवडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचा जेऊर जिल्हा परिषद गट सर्वसाधारणमधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे, त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तसेच, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांचा मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांच्या राजकारणाला ब्रेक असला आहे.

जिल्हा परिषदेतील भाजपचे (BJP) माजी गटनेते आनंद तानवडे यांचा वागदरी जिल्हा परिषद गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना फायदा झाला आहे. तसेच, चपळगाव जिल्हा परिषद गटात मंगलताई कल्याणशेट्टी जिल्हा परिषद सदस्या होत्या. आरक्षणात हा गट पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांचाही मार्ग मोकळा झाला.

सलगर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आरक्षणातून ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे शटगार यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल. नागणसूर जिल्हा परिषद गट मागील वेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता, तर यावेळी तो खुला झाला आहे.

अक्कलकोट तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये दहिटणे गणात माजी उपसभापती विलास गव्हाणे व माजी सभापती विमल गव्हाणे यांना धक्का बसला आहे. दहिटणे गण हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. पानमंगरूळ पंचायत समिती गण हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने माजी उपसभापती हिप्परगी यांना धक्का बसला आहे.

Mallikarjun Patil- Shivanand Patil
Sangola Politic's : शहाजीबापूंच्या चिरंजीवाची ZP एन्ट्री हुकली; दीपक साळुंखेंचा मुलगा जवळ्यातून रिंगणात उतरणार, शेकापकडे लक्ष

मुगळी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने माजी सभापती आनंदराव सोनकांबळे यांना अडचण निर्माण झाली आहे. शिरवळ पंचायत समिती गण ओबीसी प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात आरक्षित झाल्याने या ठिकाणचे राजकुमार बंदीछोडे हे ओबीसी प्रवर्गातील असले तरी पुन्हा सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुरनूर गण मागील वेळी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होता. या ठिकाणाहून पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड या नेतृत्व करीत होत्या. यंदा हा गण सर्वसाधारण झाल्याने अनेक मातब्बर या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे माजी सभापती सुनंदा गायकवाड व त्यांचे पती माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड यांना अन्य मतदारसंघ शोधावा लागेल.

अक्कलकोट पंचायत समितीचे सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.,त्यामुळे पंचायत समितीच्या ओबीसी मतदारसंघाला महत्त्व आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणातून अनेक मातब्बरांना धक्का बसला असून, अनेकांना मतदारसंघ बदलावे लागतील किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पाच वर्षांचा ब्रेक लागला, असेच म्हणावे लागेल.

Mallikarjun Patil- Shivanand Patil
Barshi Politic's : राजेंद्र राऊतांच्या 20 वर्षांच्या सत्तेला आमदार दिलीप सोपलांचे कडवे चॅलेंज; विश्वास बारबोलेंची साथही मिळणार

1. अक्कलकोट तालुक्यातील कोणत्या नेत्यांना आरक्षणाचा फटका बसला?
माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील आणि माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना त्यांच्या मतदारसंघ आरक्षित झाल्याने फटका बसला.

2. कोणत्या नेत्यांना आरक्षणाचा फायदा झाला?
भाजपचे आनंद तानवडे आणि मंगलताई कल्याणशेट्टी यांना त्यांच्या गटात अनुकूल आरक्षण मिळाले आहे.

3. पंचायत समितीचे सभापतिपद कोणासाठी राखीव आहे?
ओबीसी महिला प्रवर्गासाठी सभापतिपद राखीव आहे.

4. आरक्षणामुळे तालुक्यात काय परिणाम झाला?
अनेक अनुभवी नेत्यांना मतदारसंघ बदलावा लागेल, तर काहींच्या राजकीय कारकिर्दीला तात्पुरता ब्रेक लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com