GBS In Solapur : सोलापुरात GBS चे आणखी चार रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

Solapur Collector PC : येत्या 30 तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ‘हाऊस टू हाऊस’ सर्वे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व GBS रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
Collector Kumar Ashirwad
Collector Kumar AshirwadSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 January : सोलापूर जिल्ह्यात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) आतापर्यंत पाच रुग्ण आहेत, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत चारही रुग्णांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे चारही रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पुण्यात जीबीएसची (GBS) लागण झालेल्या रुग्णाचा २६ जानेवारी रोजी उपचारादरम्यान सोलापुरात मृत्यू झाला होता. प्राथमिक अहवालानुसार त्या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचे दिसत आहे. मात्र, शंभर टक्के खात्री करण्यासाठी त्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला, हे समजणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जीबीएसबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सोलापुरात (Solapur)आतापर्यंत जीबीएसचे 5 रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी त्याची लक्षणं, उपचारासाठी काय करावं, याची माहितीसाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत.

सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पाच रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात संशयित आणि 1 मृत असे जीबीएसचे एकूण 5 रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळले आहेत. यातील चारही रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील असून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.

Collector Kumar Ashirwad
Shivsena Leader Missing Case : शिंदे गटाच्या नेत्याच्या बेपत्ता प्रकरणाला नवे वळण; भावाच्या विरोधात तक्रार दाखल

येत्या 30 तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ‘हाऊस टू हाऊस’ सर्वे करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व GBS रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलं आहे.

डॉ. वैशंपायन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी जीबीएसबाबत घ्यायवाची दक्षता याबाबत माहिती दिली. ते म्हणाले. जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. जीबीएसमध्ये दूषित पेशी ह्या नर्व्हस सिस्टीमवर अटॅक करतो. जुलाब आणि उलट्या झाल्याने पायातील शक्ती गेली तर ही त्याची लक्षणं आहेत.

सर्दी झाल्यानंतर हात पायातील शक्ती जाऊन गिळायला त्रास होणे आणि दम लागणे, हातापायाला मुंग्या येणे ही जीबीएस या आजाराची लक्षणं आहेत. ही लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषधं घेऊ नयेत. 5 वर्षापर्यंतची मुलं आणि 60 वर्षांच्या पुढील वयोमानाच्या लोकांमध्ये हा आजार प्रामुख्याने जाणवतो, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

डॉ. ठाकूर म्हणाले, जीबीएस आजारावरील औषधांसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपये दिले आहेत. सध्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्यांसाठी 10 आणि लहान मुलांसाठी 5 व्हेटिलेटर आरक्षित ठेवले आहे. जीबीएस रुग्णांसाठी अजून वेगळा वॉर्ड सोलापुरात अद्याप निर्माण केलेला नाही.

Collector Kumar Ashirwad
Maruti Chitampalli : पद्मश्री मारुती चितमपल्लींनी उलगडली पालकमंत्री गोरेंसमोर निसर्गाची गुपिते...

नागरिकांनी शिळं अन्न खाऊ नये. व्यवस्थित शिजलेलं अन्न खावे. बिस्लरीचे पाणी प्यावे अथवा पाणी गरम करून ते प्यावे. हा आजार 100 टक्के बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com