Shivsena Leader Missing Case : शिंदे गटाच्या नेत्याच्या बेपत्ता प्रकरणाला नवे वळण; भावाच्या विरोधात तक्रार दाखल

Palghar Shivsena Leader News : शिवसेना शिंदे गटाचे अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून गायब आहेत. अशोक धोडी यांनी 20 जानेवारी रोजी आपण घरी येत असल्याचे पत्नीला फोन करून कळविले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आहे.
Ashok Dhodi
Ashok DhodiSarkarnama
Published on
Updated on

Palghar, 28 January : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) डहाणूचे (जि. पालघर) समन्वयक अशोक धोडी हे गेली नऊ ते दहा दिवसांपासून गायब झाले आहेत, त्यामुळे पालघरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आत नवे वळण मिळाले असून धोडी यांचे बंधू अवी धोडी आणि इतर दोघांवर घोलवड पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आज सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल होतील, अशी माहिती पालघरचे जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

शिवसेना शिंदे गटाचे (shivsena Shinde Group) अशोक धोडी हे २० जानेवारीपासून गायब आहेत. अशोक धोडी यांनी २० जानेवारी रोजी आपण घरी येत असल्याचे पत्नीला फोन करून कळविले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आहे. धोडी हे मोटारीसह गायब आहेत. धोडी यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांची पत्नी आणि मुलाने काही नावेही पोलिसांना सांगितली आहेत.

अशोक धोडी आणि त्यांचे बंधू अवी धोडी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीवरून वाद होते, त्यातून हा अपहरणाचा प्रकार घडलेला असावा, अशी शक्यता अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.

Ashok Dhodi
Karmala News : बागलांना मोठा धक्का; उस्मानाबाद जनता बॅंकेकडून वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई

पालघरचे (Palghar) जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, अशोक धोडी हे वीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता डाहणूला उतरले होते. त्यानंतर ते सायंकाळी सहा वाजता घोलवड येथे गेले होते. त्यांना भेटलेल्या लोकांचा जबाब घेतला आहे. मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासत आहेत. तसेच मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणी वेगवेगळ्या टीम काम करत आहेत.

दरम्यान, अशोक धोडी यांच्या बेपत्ता प्रकरणी काही नावं निष्पन्न झाली आहेत, त्यांच्यावर सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल होतील. स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणूचे पोलिस तपास करीत आहेत, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

घोलवड पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आठ दिवस झाले. मात्र, पोलिसांनी कोणतीही ॲक्शन अजून घेतलेली नाही. माझ्या वडिलांचे अपहरण होऊन आठ दिवस झाले आहेत, तरीही पोलिसांना अजूनही काहीही मिळालेले नाह, असा आरोप अशोक धोडी यांच्या मुलाने केला आहे.

Ashok Dhodi
Tatkare Vs Gogawale : भरत गोगावलेंचा तटकरेंवर गंभीर आरोप; ‘शिवसेनेच्या आमदारांना पाडण्यासाठी सेटलमेंट...’

त्या गोष्टीमुळे अपहरणाच्या आरोपाला बळकटी

दरम्यान, अशोक धोडी यांच्या मोटारीच्या काचा डोंगरीजवळ आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, त्यामुळे कुटुंबाने केलेल्या अपहरणाच्या आरोपाला बळकटी मिळत आहे. धोडी यांच्या बेपत्ता होण्यावरून अनेक तर्क-वितर्क व्यक्त होऊ लागले आहेत. धोडी यांच्या गायब होण्यामागे राजकीय कारण आहे का, हेही पोलिसांकडून तपासले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com