Sindhudurg DPDC : सिंधुदुर्ग डीपीडीसीवर पूर्णपणे राणे कुटुंबीयांचे वर्चस्व

Sindhudurg District Planning Committee : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकत्व राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे दिले आहे.
Narayan Rane, Nilesh Rane And Nitesh Rane
Narayan Rane, Nilesh Rane And Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. काहीच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील जाहीर केले. या यादीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकत्व राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे दिले आहे. यामुळे ऐन वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पालकमंत्र्याच्या नियुक्त्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मात्र अपवाद ठरला आहे. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्यावरून जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहचली होती. जी आता संपुष्ठात आली आहे. जिल्ह्याच्या डीपीडीसीवर पूर्णपणे राणे कुटुंबीयांने ताबा मिळवला असून चार सदस्यीय समितीमध्ये राणे कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश असणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग डीपीडीसीचे अध्यक्ष असणार असून ते कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे असून ते या समितीमध्ये असणार आहेत. तसेच राणे कुटुंबातील आमदार निलेश राणे हे देखील या समितीत असणार असून ते शिंदे शिवसेनेचे कुडाळ विधानसभेचे आमदार आहेत. तर या समितीत शिंदे शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर असणार आहेत. यामुळे सिंधुदुर्ग डीपीडीसीवर पूर्णपणे राणे कुटुंबीयांचा ताबा असणार आहे.

समितीची रचना

यासमितीत एक अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिव आणि इतर सदस्य असतात. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील दोन्ही सभागृहांचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि महापौर हे देखील निमंत्रित सदस्य असतात.

Narayan Rane, Nilesh Rane And Nitesh Rane
Nilesh Rane : सभा राणेंची बंदोबस्त भास्कर जाधवांच्या ऑफिसबाहेर

राणे कुटुंबाची पकड मजबूत

सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. पण शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडले आणि येथे राणे-उद्धव ठाकरे असा वाद सुरू झाला. यानंतरच शिवसेनेला जिल्ह्यात उतरती कळा सुरू झाली. सध्या नारायण राणे भाजपचे खासदार असून त्यांचे एक पूत्र भाजपचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर जेष्ठ सुपूत्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.

आता तर डीपीडीसीवर राणे कुटुंबाची पकड मजबूत झाली असून एकहाती नियंत्रण आले आहे. यामुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राणे यांची पकड मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील तीन सद्यस्य हे डीपीडीसीवर येणार असल्याने आता राणे कुटुंबावर टीकेची झोड उठली असून नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Narayan Rane, Nilesh Rane And Nitesh Rane
Narayan Rane : नारायण राणेंनी भरला ठाकरेंच्या शिलेदाराला सज्जड दम; म्हणाले, '...तर तुझ्या घराला टाळेच ठोकतो'

मला यात नकारात्मक असे काही दिसत नाही. आम्हाला तिघांनाही लोकांनी निवडून दिले असून आम्ही डीपीडीसीमध्ये आहोत. आम्ही अवैधरित्या हे पद बळकावलेले नाही. लोक प्रतिनिधी म्हणून सिंधुदुर्गाचा विकास करणे ही आमची जबाबदारी असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com