
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना म्हणजेच गडहिंग्लजचा गोड साखर कारखाना कर्जाच्या रकमेमुळे चर्चेत आहे. जिल्हा सहकारी बँक मार्फत या कारखान्याला कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र आता कोट्यावधींच्या कर्जामुळे हा कारखानाच अडचणीत आल्याचे समोर आले आहे. यावरून जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रोष व्यक्त केला जातोय. तसेच त्यांच्यावर गोड साखर कारखाना स्वतःच्या स्वार्थासाठी बंद पाडण्याचे पाप त्यांनी केल्याचा आरोप देखील सतत केला जातोय. असा आरोप याआधी जनता दलाच्या नेत्या गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केला होता. तर आता कारखान्याच्या एका माजी संचालकाने असाच आरोप करताना, हा कारखानाच विक्रीला काढण्याच्या घाट घातल्याचा दावा केला आहे. तर हा दावा करतानाही त्या संचालकाने मुश्रीफ याचे नाव घेतल्याने पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर कोठावधींचे कर्ज असून आणखीन कर्जात तू लोटला जातोय. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तो विक्रीला काढण्याचा घाट जिल्ह्याच्या नेत्यांसह संचालक मंडळाचा असल्याचा आरोप कारखान्याचे माजी संचालक व सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी केला होता. या आरोपामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
गडहिंग्लज तालुका संघ व बाजार समितीच्या संचालक मंडळाची यादी पाहिल्यास या संस्थाशी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचा संबंध आहे की नाही हे लक्षात येईल. त्यांनी शासकीय भांडवल परत देण्यासाठी 17 लाख रुपये कुठल्या खात्यावरून दिले, असा आरोपही खोत यांनी मुश्रीफांवर केला होता. आपल्या विरुद्ध कोणी बोलायचेच नाही, असे कोणी म्हणत असेल तर गडहिंग्लजचे बीड व्हायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे इथला 'आका' कोण हे आता जनतेने शोधावे, अशी खोचक टीका देखील खोत यांनी मुश्रीफ यांच्यावर केली होती.
या टीकेला सतीश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गडहिंग्लज साखर कारखाना सुरू राहण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी किती प्रयत्न केलेत व्याख्या जिल्ह्याला माहित आहे. शहापूरकरांसह संचालक मंडळाला बोलावून चुका दुरुस्त करण्याच्या सूचना वेळोवेळी मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. तर येत्या दोन वर्षात कारखाना उत्तम रित्या चालवून दाखवू असे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी सांगितले आहे. यामुळे कोणत्या 'आका'चे गुणधर्म व संस्कार कोणामध्ये आहेत? हे लोकांना चांगले ठाऊक आहे. कारखान्याचे सभासद यांना देखील त्याची माहिती असल्याचा टोला सतीश पाटील यांनी लगावला आहे.
सतीश पाटील यांनी शिवाजी खोत यांच्यावर पत्रकाद्वारे हल्लाबोल करताना, स्वर्गीय कुपेकर यांच्या उपकारांवर, त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांवर हल्ला कोणी केला. बाजार समितीच्या माजी दलित संचालकांना मारहाण करणारा कोण? याची माहिती जनतेला आहे. पुतण्या मेव्हण्याच्या नावावर बाजार समितीची 28 गुंठे मोक्याची जागा कोणी लाटली? याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा इशाराही सतीश पाटील यांनी दिला आहे. प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद उपाध्यक्षापर्यंत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचा टोला सतीश पाटील यांनी शिवाजी खोत यांना लगावला आहे.
तर प्रकल्पाचे शासकीय भाग भांडवल भागवण्यासाठी मुश्रीफांकडून 17 लाख रुपये का आणले याचे उत्तर त्यांनी द्यावे, तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत. पण लक्ष्मी चौकात यायला शिवाजी खोत तयार नाहीत. कुपेकरांचा विश्वासात घात केलेल्यांनी निष्ठेची भाषा वापरू नये, असा आहे टोलाही यावेळी सतीश पाटील यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.