
Hasan Mushrif News : विधानसभा निवडणुकीनंतर कागल विधानसभा मतदारसंघातील मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. कागलमधील राजर्षी शाहू महाराज सांस्कृतिकच्या सभागृहाच्या जागेवरून मंत्री मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
सध्या राजर्षी शाहू सांस्कृतिक हॉलचे बांधकाम सुरू आहे. मात्र या जागेवर घाटगे यांनी दावा करत कायदेशीर नोटीस धाडली आहे. त्यामुळे सभागृहाचे बांधकाम ठप्प आहे. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना निर्वाणीचा इशारा देत कागलकरांच्या स्वाभिमानाला डिवचू नका, असा थेट इशारा दिला आहे.
कागल तहसील कार्यालय, शाहू हॉल हा परिसर कागल संस्थानातील भूतपूर्व संस्थानिक घराण्याचा मालकीचा आहे, असा दावा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी करत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या कामाला कायदेशीर नोटीस देत कामावर स्थगिती आणली. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी वारंवार घाटगे यांना लक्ष केले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देखील घाटगे यांच्यावर मंत्री मुश्रीफ यांनी टीकेचा आसूड ओढला.
राजर्षी शाहू संस्कृती हॉल हा कागलच्या अस्मितेचा विषय आहे. मात्र घाटगे यांनी ही जागा स्वतःच्या नावावर लावून घेतली आहे. कायदेशीररित्या आम्ही त्याला स्थगिती आणली आहे. पण आत्ता त्याने कागलकरांच्या स्वाभिमानाला हात घालून त्यांना डिवचू नये, असा इशारा मुश्रीफ यांनी कागलमधील विविध शासकीय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या पायाभरणी समारंभात दिला आहे.
'काल-परवापर्यंत या सभागृहात अनेक कार्यक्रम झाले असून स्वर्गीय विक्रम सिंह घाटगे यांनी देखील या हॉलमध्ये अनेक कार्यक्रम घेतले आहेत. घाटगे यांच्या पूर्वजांनीच ही जागा शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी दिली आहे. त्यामुळे कागल शहराच्या विकासासाठी ही जागा त्यांनी परत द्यावी. त्यामुळे विनाकारण न्यायालयीन प्रक्रियेत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईलअसे करू नये', असा सल्ला देखील मंत्री मुश्रीफ यांनी घाटगे यांना दिला आहे. त्यामुळे आत्ता समरजित घाटगे काय उत्तर देतात याकडे कागलकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.