Ajit Pawar News : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार का? अजित पवार म्हणाले...

Legislative Council News : विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० आमदार होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Uddhav Thackeray News : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. त्यामुळे विधान परिषदेचे ठाकरे गटाचे संख्याबळ एकने कमी झाले आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले.

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० आमदार होते. त्यामुळे टाकरे गटाकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाची संख्या कमी झाली आहे. त्यावरुन अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का? यावर अजित पवार स्मितहास्य करत म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही यावर विचार करू.

Ajit Pawar
Beed Loksabha News : मागच्या लोकसभेला सात आमदार, आता तिघेच ; डाॅ. मुंडेंना ताकद लावावी लागणार..

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आमची बैठक आधीच ठरली आहे. जयंत पाटील आणि मी आधीच ती ठरवली आहे. या बैठकीचा व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा संबंध नाही. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ९ जूनला जी सभा घेणार होतो, ती पावसामुळे रद्द झाली. ती निमंत्रितांची सभा २१ जूनला आहे. स्वतः शरद पवारसाहेबांनी ती सभा ठेवली आहे.

अजित पवार म्हणाले, आमची महाविकास आघाडी आहे. लगेच बातम्या चालवू नका. विधानसभा, विधान परिषदेत ज्या वेळेस विरोधी पक्षनेतेपद देण्याची वेळ येते त्यावेळी ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांना ते दिले जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही ४१ आमदार होतो, काँग्रेसचे ४२ आमदार होते. तरीदेखील ५ वर्ष ते पद काँग्रेसकडे होते.

Ajit Pawar
Uddhav Thackeray News : मनीषा कायंदेंमुळे ठाकरे गटाची अडचण; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही जाणार?

दरम्यान, विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एकच आमदार होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार आहेत. दरम्यान, कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ आमदार राहिले आहेत. तर काँग्रेसकडे (Congress) ८ जागा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com