Nilesh Lanke News : निलेश लंकेंची विखे पाटलांवर टीका; म्हणाले, "माझी आमदारकी जनता ठरवेल, पण तुमच्या पुत्राची खासदारकी..."

Ganesh Sugar Factory Election : गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हेंचा पॅनल बहुमताच्या दिशेने
Nilesh Lanke, Radhakrishna Vikhe Patil
Nilesh Lanke, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke Attackn on Radhakrishn Vikhe Patil : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याची आज सोमवारी (ता. १९) निवडणूक होत आहे. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात-विवेक कोल्हे यांच्या पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत काराखान्याच्या १९ जागांपैकी ८ जागांवर थोरात आणि कोल्हे पॅनेलने विजय मिळवला आहे. या कारखान्यावर बहुमताने विजय मिळवण्याच्या दिशेने थोराच-कोल्हे गटाची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Nilesh Lanke, Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar News : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार का? अजित पवार म्हणाले...

गणेश कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत थोरात-कोल्हे गटाची मोठी सरशी असल्याचे दिसून येत आहे. या गटातील उमेदवारांनी विखेंच्या तीन उमेदवारांचा थेट राहाता गटातच पराभव केला आहे. यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे. विखे पाटलांच्या गटाची पराभवाकडे वाटचाल सुरू असून त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.

Nilesh Lanke, Radhakrishna Vikhe Patil
Fake Major Arrest in Pune : पुण्यात तोतया मेजरला अटक; लष्कराच्या गुप्तचर विभागाची कारवाई

निलेश लंके बालीश आहेत. त्यांना पुन्हा आमदार व्हायचे नाही का, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर गणेशच्या निकालनांतर लंके यांनी विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. निलेश लंके म्हणाले, "ही निवडणूक 'विखेंच्या दहशतीचे झाकण उडवा' या टॅगलाईन खालीच लढवली होती. त्यामुळे आता विखेंच्या दहशतीचे झाकण उडाले आहे. भविष्यात ते सापडणारच नाही. 'होम ग्राऊंड'च तुमचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. हा तर 'ट्रेलर' आहे अजून 'पिक्चर' बाकी आहे. मी आमदार होणार की नाही हे पारनेरची जनता ठरवेल, मात्र तुमचा लाडका पुत्र खासदार होणार ती नाही हे आम्ही ठरवू."

Nilesh Lanke, Radhakrishna Vikhe Patil
Sadabhau Khot Slam Sanjay Raut : राऊत म्हणजे दादा कोंडके पार्ट टू ; सदाभाऊ खोतांनी उठवली खिल्ली

राहाता तालुक्यातील गणेशनगर साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आठ वर्षांपासून सत्ता आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे यांनी बाळासाहेब थोरात यांना साथ दिली. या थोरात-कोल्हे गटाने विखे पाटलांना कडवी झुंज दिली. आज झालेल्या मतमोजणीत कारखान्याची सत्ता थोरात- कोल्हे गटाकडे जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी जोरदार जल्लोष सुरू केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com