Shahaji Patil : महाराष्ट्राच्या छोट्या पुढाऱ्यालाही डोंगर, झाडीवाल्या आमदाराची भूरळ

Ghanshyam Darode : आमदार पाटलांनी केले घनश्याम दरोडेंचे कौतुक
Shahaji Patil
Shahaji Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.." या वाक्यामुळे चर्चेत आलेले आमदार शहाजी पाटील यांची सेलिब्रिटींनाही भूरळ पडल्याची दिसून येत आहे. महाराष्ट्राचा 'छोटा पुढारी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घनश्याम दराडे व 'रिलस्टार' सूरज चव्हाण यांनी सांगोला येथे आमदार शहाजी पाटील यांची गुरुवारी (ता. १८) भेट घेतली. यावेळी दोघांनीही आमदार पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

Shahaji Patil
Karnataka Politics : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री फोन वापरतच नाहीत; सिद्धरामय्यांच्या काही ठळक गोष्टी..

घनश्याम दराडे व सूरज चव्हाण यांनी आमदार शहाजीबापूंची (Shahaji Patil) भेट घेऊन त्यांच्यासोबत गप्पागोष्टीही केल्या. यावेळी बोलताना 'छोटा पुढारी' घनश्याम दराडे यांनी अस्सल गावरान बोली आणि रांगड्या भाषेमुळे लोकप्रिय ठरलेल्या आमदार शहाजीबापू यांचे भाषण आपण सर्वात आधी ऐकत असल्याचे सांगितले.

घनश्याम म्हणाले, "आज टेलिव्हिजन आणि यूट्यूब सारखी माध्यमे सुरू केल्यास सगळीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप केल्याचे व्हिडिओ आणि विविध राजकीय नेत्यांचे भाषणे पहायला मिळतात. परंतु या सर्व 'व्हिडिओ'मधे आपण शोधून आमदार शहाजीबापू पाटील यांचे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहतो. बापूंची बोलण्याची पद्धत, भाषेवर आलेले प्रभुत्व, त्यांची अस्सल गावरान बोली भाषा आणि आवाजाची लकब आपल्याला प्रचंड आवडते. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक शोधून त्यांचे व्हिडिओ पाहत असतो."

Shahaji Patil
Udayanraje Bhosle : उदयनराजेंनी पालिका प्रशासनास फटकारले; म्हणाले, "अशुद्ध पाणीपुरवठा..."

दरोडे यांनी यावेळी आमदार पाटील यांचे वर्णनही केले. दरोडे म्हणाले, "ज्यांना आजवर केवळ टेलिव्हिजन आणि युट्यूबवर पाहिले त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. आमदार शहाजीबापू जितके आकर्षक भाषण करतात त्याहूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे आणि प्रभावी आहे." दरम्यान, अत्यंत कमी वयात आपल्या अलौकिक भाषण केल्यामुळे राज्यभर छोटा पुढारी अशी ओळख मिळवलेल्या घनश्याम दराडे या चिमुकल्याची राज्यातील अनेक मातब्बर नेते मंडळींनी दखल घेतली आहे. भेटीला आलेले दरोडे यांचे आमदार शहाजी पाटील यांनी कौतुक केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. (Solapur Politics)

Shahaji Patil
J P Nadda In Pune : जे पी नड्डांची बापटांच्या घरी भेट; आठवणींना उजाळा...

बाटली, बाटली काचेची बाटली...

'बाटली, बाटली काचेची बाटली. आपल्या बापूचा नाद केला तर भल्या भल्याची फाटली' असे म्हणत रिलस्टार सूरज चव्हाण यांनी आपल्या हटक्या आवाजामध्ये शहाजी बापूंवर स्तुतीसुमने उधळली. सूरज चव्हाण यांच्या हटक्या व घोगऱ्या बोलण्याने उपस्थितांमध्ये मात्र एकच अशा पिकली. (Sangola)

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com