Ashok Pawar News : आमदार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चात, पण शेतकऱ्यांनाच पोलिसांची नोटीस...

NCP Aakrosh Morcha : शेतकरी संघटना आक्रमक, घोडगंगा कारखान्याचे गळीप हंगाम बंद
Ashok Pawar
Ashok Pawarsarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादीचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवनेरीपासून आक्रोश मोर्चा सुरुवात झाली आहे. या मोर्चात आमदार अशोक पवार सहभागी झाले आहेत. मात्र, अशोक पवार संचालक असलेल्या घोडगंगा कारखान्याचा गळीप हंगाम बंद असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आक्रोश मोर्चाच्या धर्तीवर शिरूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.

Ashok Pawar
BJP Politics : भाजपचे खासदार, इच्छुक, आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर; बावनकुळेंनी वाढवली धाकधूक

शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. यावर्षीचा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभुीवर नऊ ते दहा शेतकऱ्यांना कलम १४९ च्या खाली नोटीस देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे,खासदार सुप्रिया सुळे या आक्रोश मोर्चा काढत आहेत. हा मोर्चा २७ डिसेंबरला सुरु झाला असून चार दिवसांत म्हणजे ३० डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाले आहेत. मात्र, मोर्चात सहभागी झालेले आमदार अशोक पवार हे घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक आहेत. मात्र, या कारखान्याचा गळीप हंगाम सुरू झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आक्रोश मोर्चातून शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा बंदी उठवावी, दुध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ देण्यात यावी, शेतीला पाणी देण्यासाठी वीज नसल्याने शेतकऱ्यांना समस्यांच्या सामना करावा लागतो आहे. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी, अशा विविध मागण्या अमोल कोल्हे यांनी केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com