BJP Politics : भाजपचे खासदार, इच्छुक, आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर; बावनकुळेंनी वाढवली धाकधूक

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना केलेले विधान...
Solapur News
Solapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभेची निवडणूक मोठ्या बहुमताने जिंकल्यानंतर भाजपने धक्क्यावर धक्के दिले आहेत. जुन्या, मातब्बर चेहऱ्यांना बाजूला ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मंत्रिमंडळात स्थान देतानाही भाजपने हाच निकष लावला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना केलेली विधानेही विद्यमान खासदार आणि इच्छुकांची धाकधूक वाढवणारी आहेत.

काही दिवसांपूर्वी बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा सोलापूर (Solapur) दौरा निश्चित झाला होता, मात्र त्यांना तो रद्द करावा लागला. त्यावेळी पुण्यात (Pune) त्यांनी माध्यमांशी बोलताना माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांच्या कामाची तोंडभरून स्तुती करत आगामी निवडणुकीत (Lok Sabha Election) त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत दिले होते. त्याच्या काही दिवसांपूर्वीच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे, भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Constituency) आपण इच्छुक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलेल्या खासदार निंबाळकरांच्या कौतुकाला महत्व प्राप्त झाले होते. एखाद्याचे कौतुक केले म्हणून त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे नसते, असे आता बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Solapur News
Kolhapur Politics : मुश्रीफांच्या खंद्या समर्थकाला दणका; 'भूविकास'च्या थकबाकीमुळे युवराज पाटील 'आऊट'..

ऊर्जामंत्री असताना मी चांगले काम केले, तरीही पक्षाने गेल्या निवडणुकीत मला उमेदवारी दिली नाही. पक्षाने मला थांबायला सांगितले. त्यामुळे पक्ष कोणालाही उमेदवारी देऊ शकतो, असे सांगून बावनकुळे यांनी सर्व इच्छुक, जोरदार दावा सांगणाऱ्या सर्वांनाच जमिनीवर आणले आहे. भाजपमध्ये शिस्त आहे. पक्षाचे हित सर्वोपरी मानले जाते. पक्षापेक्षा कुणी मोठा होतोय हे लक्षात आले की त्याचे पंख छाटले जातात. पक्ष केंद्रस्थानी मानला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या अजेंड्याशी, विचारसरणीशी मतभेद असणाऱ्यांना या बाबी नाकारता येणार नाहीत. तुमची पक्षाला गरज आहेच, मात्र पक्ष आहे म्हणून तुम्ही आहात, असा स्पष्ट संदेश भाजपने अलीकडच्या काळात सातत्याने दिला आहे. पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या जुन्या नेत्यांना बाजूला सारले जात असल्याने चुकीचा संदेश जाईल याची पर्वा न करता भाजपने नव्या चेहऱ्यांना घेऊन पक्षबांधणीच्या दिशेने पाऊल टाकणे सुरूच ठेवले आहे.

Solapur News
Ajit Pawar in Ahmednagar : अजित पवारांची खेळी, जुना पत्ता काढला बाहेर; थोरातांच्या भाच्याला नियुक्तीपत्र..

माढा लोकसभा मतदरसंघातील उमेदवारीचा प्रश्न चिघळू लागला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे मोदी लाटेतही माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी उमदेवारीवरून त्यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयात मेहिते पाटलांना मोठा हातभार लावला होता. मध्यंतरी काही कारणांवरून त्यांच्यात मतभेद झाले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यावेळी बावनकुळे यांनी खासदार निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले होते. दुसरीकडे, 27 डिसेंबर रोजी त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी मात्र उमेदवार बदलाचे संकेत दिले.

Solapur News
Ahmednagar Politics : उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याने टार्गेट केलं जातंय; शंकरराव गडाख स्पष्टच बोलले!

सोलापूरच्या रंगभवनमध्ये बावनकुळे यांनी वॉरियर्सची संपर्क साधला. या कार्यक्रमात त्यांनी खासदारांचा नामोल्लेख टाळल्याचे सांगितले जात आहे. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या कामाबाबत पक्षात नाराजी आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्राचे प्रकरणही न्यायप्रवीष्ट आहे. तसेही गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपने सोलापुरात उमेदवार 'रिपीट' केलेला नाही. यावेळेसही भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन उमदेवार देण्याची परंपरा कायम राखली जाण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारीसाठी 'परफॉर्मंस' हाच एकमेव निकष असेल, असा संदेश देताना बावनकुळे यांनी 'परफॉर्मंस' दाखवूनही स्वतःला थांबावे लागले होते, असे सांगून इच्छुकांना बुचकळ्यात टाकले आहे.

(Edited By - Rajanand More)

Solapur News
Ramraje Nimbalkar : रामराजेंनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट; नेमकं काय कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com