Ghosapuri Water Supply Scheme : 'घोसपुरी'चे पाणी पेटणार ; महाविकास आघाडी-भाजपमधील वाद चिघळणार !

Nagar Politics : खोसपुरी पाणी योजनेच्या अध्यक्षपदी रवींद्र कडूस यांची घोषणा झाली आहे.
Ghosapuri Water Supply Scheme Nagar Politics
Ghosapuri Water Supply Scheme Nagar Politics Sarkarnam

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar : भाजप नेते, माजीमंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले आणि नगर तालुका महाविकास आघाडीतील नेते यांच्यातील राजकीय वाद जगजाहीर आहे. खोसपुरी पाणी योजनेवरून आघाडी आणि भाजप नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. खोसपुरी योजनेचे पाणी पेटणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत राहुरी,शेवगाव, नगर, श्रीगोंदा हे चारही तालुके महत्वाचे मानले जातात. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धोबीपछाड देऊन अध्यक्ष झालेले शिवाजी कर्डीले यांनी खोसपुरी पाणी योजनेवर आपल्या गटाचे रवींद्र कडूस यांची नियुक्ती केली आहे.

Ghosapuri Water Supply Scheme Nagar Politics
Rahul Gandhi Marriage : राहुल गांधी लग्न कधी करणार ? शेतकरी महिलेच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, " तुम्हीच मुलगी शोधा"

नगर तालुक्यातील सतरा गावांना पाणीपुरवठा करणारी खोसपुरी पाणी योजना सुरवातीपासून विविध कारणामुळे वादग्रस्त ठरली आहे. या योजनेची अंमलबजावणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्याकडे होती. त्यांना राष्ट्रवादी गटाचा पाठिंबा आहे. मात्र, या योजनेबाबत आणि पीककर्ज व्याज परताव्याचा मुद्यांवरून कर्डीले आणि आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोसपुरी पाणी योजनेच्या अध्यक्षपदी रवींद्र कडूस यांची घोषणा झाली आहे. यावर नगर तालुका महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हाराळ यांनी आक्षेप घेतला आहे. "प्रशासनाने मावळते अध्यक्ष, सचिव यांना विश्वासात न घेता ही निवड केली आहे. एवढी हुकूमशाही तालुक्यात कधीही नव्हती आता नवीन पदाधिकारी कुणाकडून पदभार स्वीकारणार आहेत," असा खोचक सवाल संदेश कार्ले यांनी उपस्थित केला आहे.

Ghosapuri Water Supply Scheme Nagar Politics
Datta Samant Murder Case : दत्ता सामंत हत्या प्रकरणात साक्षीदार फितूर झाल्याने छोटा राजनची मुक्तता

महाविकास आघाडीच्या या टीकेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे आघाडीतील नेत्यांच्या कमकुवत बुध्दीवरचे नियंत्रण ढासळले आहे. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शिवाजी कर्डीले यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. माजी खासदार दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे," असा आरोप दिलीप भालसिंग यांनी केला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com