Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'मध्ये अध्यक्षपदाच्या धक्कादायक हालचाली, डोंगळे राजीनामा देणार नाहीत?

Kolhapur Politics : गोकुळ दूध संघावर काँग्रेसने ते आमदार सतेज पाटील यांच्याकडून अध्यक्षपदाचे नाव दिले जाणार होते. त्याला धक्का बसणार आहे. दरम्यान, डोंगरे उद्या नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाची लक्ष लागलेले आहे.
Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh
Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak SanghSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या हालचाली अत्यंत गतिमान झाल्या आहेत. 15 मे रोजी गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे हे राजीनामा देणार होते. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष असावा, या दृष्टिकोनातून गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशा सूचना संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत.

दरम्यान, गोकुळ दूध संघावर (Gokul Dudh Sangh) काँग्रेसने ते आमदार सतेज पाटील यांच्याकडून अध्यक्षपदाचे नाव दिले जाणार होते. त्याला धक्का बसणार आहे. दरम्यान डोंगरे उद्या नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाची लक्ष लागलेले आहे.

25 वर्षे गोकुळ दूध संघावर सत्ता असलेल्या महाडिक गटाला सुरुंग लावत मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil), आमदार विनय कोरे यांच्यासह तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोकुळ दूध संघावर विजय मिळवला. सुरुवातीला दोन वर्ष गोकुळचे अध्यक्ष पद सतेज पाटील यांच्या गटाकडे होते. त्या दोन वर्षात माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.

त्यानंतरच्या काळात मुश्रीफ गटाकडे हे अध्यक्ष पद दोन वर्षासाठी आले. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कारभार होता. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नियमानुसार डोंगळे यांची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. डोंगळे हे उद्या राजीनामा देण्याच्या तयारीत असतानाच गोकुळमध्ये धक्कादायक राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Kolhapur Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh
Tejasvee Ghosalkar : भले भले सोडून गेले... पण राजीनामा देताच समजूत काढण्यासाठी 'मातोश्रीच' बोलावणं; कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे सध्या मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशा स्पष्ट सूचना डोंगळे यांना दिले आहेत. 25 मे रोजी पर्यंत अध्यक्ष देण्याच्या हालचाली गोकुळमध्ये होत्या. मात्र या घटनेनंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का बसणार आहे. दरम्यान डोंगळे उद्या नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागू राहिले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपद महायुतीकडेच असावे, सूचना डोंगळे यांना दिल्याचे समजते. दरम्यान, दोन-दोन वर्ष दक्षिपद वाटून घेतल्यानंतर उर्वरित एक वर्षासाठी अध्यक्षपदाचा मान पाटील गटाकडे होता.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे अध्यक्षपद महायुतीकडेच असावे, सूचना डोंगळे यांना दिल्याचे समजते. दरम्यान, दोन-दोन वर्ष दक्षिपद वाटून घेतल्यानंतर उर्वरित एक वर्षासाठी अध्यक्षपदाचा मान पाटील गटाकडे होता. 25 मे रोजी पर्यंत अध्यक्ष देण्याच्या हालचाली गोकुळमध्ये होत्या.

मात्र, या घटनेनंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का बसणार आहे. दरम्यान डोंगळे उद्या नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागू राहिले आहे.

25 मे रोजी पर्यंत अध्यक्ष देण्याच्या हालचाली गोकुळमध्ये होत्या. मात्र या घटनेनंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का बसणार आहे. दरम्यान डोंगळे उद्या नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागू राहिले आहे.

दरम्यान, दूधसंघावर महायुतीचा अध्यक्ष असावा यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न सुरू होते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय स्थिती सांगितल्यानंतर परिस्थिती जैसे ते ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. अध्यक्षपदाच्या चर्चा या ठिकाणी थांबले असतानाच, पुन्हा एकदा माहितीचा अध्यक्ष करण्यासाठी राजकीय हालचाल गतिमान झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com