Gokul Dairy : अध्यक्षपदाचा धुरळा बसताच 'गोकुळच्या' रिंगणात आप्पा महाडिकांचा शड्डू; सतेज पाटलांच्या कारभाराचे वाभाडे

माजी आमदार आणि 25 वर्षे 'गोकुळ' दूध संघावर सत्ता राखलेल्या महादेवराव महाडिक पुढील वर्षी होणाऱ्या निवजणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघात मागचा एक महिना अध्यक्ष निवडणुकीवरून प्रचंड राजकारण तापलं. यात महायुतीने बाजी मारत अध्यक्ष आपल्याच कह्यातील करण्याच हट्ट पूर्ण केला. हा विषय आता मार्गी लागला असतानाच पुढील वर्षीच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. माजी आमदार आणि 25 वर्षे 'गोकुळ'वर अधिराज्य गाजवलेले महादेवराव महाडिक पुन्हा मैदानात उतरले आहेत.

मागील 25 वर्ष गोकुळ दूध संघावर महाडिक गटाची सत्ता होती. पण 2021 मध्ये काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सत्ता उलथवून टाकली. पण ही जखम भरून काढत यंदा पुन्हा गोकुळ ताब्यात घेण्यासाठी महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. गोकुळ दुधाचे संकलन घटल्याचा आणि अमूल दुधाचे संकलन वाढल्याचा दावा करत महाडिक यांनी सत्ताधारी गटावर कडाडून टीका केली.

महाडिक म्हणाले, सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी 4 वर्षांत जवळपास 1500 दूध संस्था नव्याने वाढवल्या. एवढ्या दूध संस्था वाढल्या; पण प्रत्यक्षात दूध संकलनात वाढ झालेली नाही, उलट परजिल्ह्यातून, परराज्यातून दूध घ्यावे लागते. हीच का ‘गोकुळ’ची प्रगती? असा सवाल करत आजही परराज्यातून जिल्ह्यातून किमान पाच ते साडेपाच लाख लिटर दूध संकलन केले जाते. नवी दूध संस्था काढायची म्हटल्यास त्या संस्थेचे रोज किमान 50 लिटर दूध संकलन असावे लागते, हा नियम असल्याचे सांगत महाडिक यांनी शंका उपस्थित केली.

Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Gokul News : 'गोकुळ'चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ अन् संचालक मंडळाला अजितदादांनी पहिल्याच भेटीत स्पष्ट शब्दांत करुन दिली 'ती' जाणीव

जर सत्ताधाऱ्यांनी चार वर्षांत 1500 दूध संस्था नव्याने काढल्या असतील, तर दररोज किमान 75 हजार लिटर दूध संकलन वाढले पाहिजे. पण हे वाढीव दूध दिसत नाही. याउलट संकलन केंद्रावर पाहणी केल्यास एका एका कॅनमधून पाच ते दहा लिटरही दूध येत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यात एक नंबरवर असलेला जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय रसातळाला जाईल. म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक आपण समविचारी लोकांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचो घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली.

Mahadevrao Mahadik slams Congress MLA Satej Patil
Gokul Politics : गोकुळमध्ये पुन्हा संघर्ष? वाढवलेल्या ठरावांचा नेता कोण? घमासान होण्याची चिन्हे

आम्ही ‘गोकुळ’च्या सत्तेत होतो, त्यावेळी ‘अमूल’ला विरोध केला. त्याला जिल्ह्यात येण्यापासून रोखले. पण आजची परिस्थिती पाहता आज अमूल दूध शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून रोज दीड लाख लिटर दूध संकलन करत आहे. ‘अमूल’ला जिल्ह्यात कोणी प्रवेश दिला, याची चौकशी झाली तर त्यालाही ‘गोकुळ’चे लोकच जबाबदार आहेत. मुंबईतील दुधाचा दर्जा घसरला आहे. मुंबईतील केंद्रांवरती रोज पाच-दहा हजार लिटर दूध अतिरिक्त कसे येते? या प्रश्‍नांची उत्तरे नेत्यांकडे नाहीत, असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com