Gokul News : 'गोकुळ'चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ अन् संचालक मंडळाला अजितदादांनी पहिल्याच भेटीत स्पष्ट शब्दांत करुन दिली 'ती' जाणीव

Gokul Politics : कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघावर नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर राजकीय घडामोडी शांत झाल्या. संघावर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप केला. त्याप्रमाणे संघावर महायुतीचा अध्यक्ष झाला. पण....
AJIT PAWAR oN GOKUL AJIT PAWAR
AJIT PAWAR oN GOKUL AJIT PAWAR Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'गोकुळ'चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांनी बुधवारी(ता.4) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, गोकुळ दूध संघ हा सहकार व दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था असून गोकुळने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. दुग्ध व्यवसायामध्ये तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असून गोकुळसारख्या संस्थांनी यामध्ये आघाडी घ्यावी. आम्ही शासनस्तरावर मागोवा घेऊन सहकार्य करू. दूध व्यवसायवाढीसाठी गोकुळला लागेल ती प्रत्येक मदत करण्यात येईल. गोकुळचा विस्तार म्हणजे शेतकऱ्यांचा विकास असे प्रतिपादन व्यक्त केले.

या बैठकीत गोकुळच्या Gokul वतीने मुंबईतील एन.डी.डी.बी. (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) च्या जागेची मागणी ही या भेटीत करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा, शासनाकडून आवश्यक ती मदत नक्की केली जाईल.

तसेच राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदानाबाबतही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनास हे अनुदान तत्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

AJIT PAWAR oN GOKUL AJIT PAWAR
Nilesh Chavan: मोठी बातमी: निलेश चव्हाणनं लपवली धक्कादायक माहिती; पिस्तुल परवान्याची सतेज पाटलांनीच काढली ऑर्डर

याचदरम्यान, दुग्ध व्यवसायात आधुनिकतेचा वापर वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसाय वाढीसंदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी गोकुळचे माजी अध्यक्षांसह संचालक मंडळ उपस्थित होते.

सध्या गोकुळ दूध संघावर महायुतीमधील प्रमुख नेते आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एकत्रित सत्ता आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके त्यांच्यासह काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत.

AJIT PAWAR oN GOKUL AJIT PAWAR
Laxman Hake: हाकेंच्या अडचणी वाढणार; गिफ्ट मिळालेल्या फॉर्च्युनर गाडीची चर्चा अन् ड्रायव्हर म्हणतो; पगार बुडवला,पत्नीला...

कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघावर नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर राजकीय घडामोडी शांत झाल्या. संघावर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप केला. त्याप्रमाणे संघावर महायुतीचा अध्यक्ष झाला. पण स्थानिक स्तरावर शाहू आघाडीचा अध्यक्ष झाला, असा दावा करण्यात येतोय. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हाच घोळ कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com