Gokul Election : गोकुळमध्ये मोठा भूकंप : अवघ्या अर्ध्या तासात निवडणूक अधिकाऱ्याची बदली; अदृश्य शक्तीचा हसन मुश्रीफांना धक्का

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अंतिम मतदार यादीवरील सुनावणीच्या अवघ्या अर्धा तास आधी विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांची बदली झाली.
Gokul Dudhsang 2026
Gokul Dudhsang 2026Sarkarnama
Published on
Updated on

Gokul Election : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. अंतिम मतदार यादीचा टप्पा जवळ आला असताना, सुनावणी सुरू होण्याच्या अवघ्या अर्धा तास आधी विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या जागी नारायण परजणे रुजू झाले. हा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, संस्थाचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मिसाळ यांनी बदली वैद्यकीय कारणास्तव झाल्याचे स्पष्ट केले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम यादी बनवण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया सुरू असतानाच कार्यालयीन वेळ सुरू होण्याच्या अर्धा तासातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि जनसुराज्य शक्तीच्या नेत्यांना अदृष्य शक्तीने मोठा झटका दिला आहे.

Gokul Dudhsang 2026
3 free LPG cylinders : LPG ग्राहकांची चांदी! मुख्यमंत्र्यांचे मोठे गिफ्ट,आता वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर; जाणून घ्या 'या' राज्याचा मोठा निर्णय!

गोकुळ दूध संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय उपनिबंधक देविदास मिसळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मिसाळ यांची बदली झाल्यानंतर संस्था चालकांनी गोंधळ घातला. त्यांच्या ठिकाणी नारायण परजणे हे अधिकारी अचानक रुजू झाल्याने हा सर्व प्रकार समोर आला.

गोकुळ दूध संघाची निवडणूक 60 दिवसात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानंतर दिल्याने दुग्ध निबंध कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. शनिवार 22 ऑगस्ट पर्यंत या प्रारूप यादीवर हरकती घेण्याची मुदत असल्याने जवळपास 600 ते 700 पेक्षा अधिक हरकती या प्रारूप यादीवर आल्या होत्या.

तर सोमवार 24 ऑगस्ट पासून आलेल्या हरकतीवर सुनावणी घेण्याचे काम सुरू असताना सकाळी साडेदहा वाजता विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांची बदली करण्यात आली. तर त्या ठिकाणी नारायण परजने हजर झाल्याने हा प्रकार समोर आला.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही संस्थाचालक सुनावणीसाठी उपस्थित होते. घडलेला प्रकार समजतात संस्थाचलकांनी दुग्ध निबंध कार्यालयामध्ये गोंधळ घालत या प्रकाराचा निषेध केला. गोकुळ मधील अदृश्य शक्तीला न्यायालयाच्या आदेशानंतर ही काही संस्था अपात्र करायच्या आहेत. त्यामुळे अदृश्य शक्तीने थेट अधिकारी बदलला असल्याचा आरोप मुश्रीफ गटाच्या संस्थाचालकांकडून होत आहे.

दरम्यान, देविदास मिसाळ यांनी वैद्यकीय कारण देत आपण रजेवर जाणार असल्याचं कारण दिल असल्याचं पत्र सहकार विभागाकडून देण्यात आले. त्या ठिकाणी नारायण पर्जने हे रुजू होणार असल्याचे पत्रही सकाळी साडेदहा वाजता दुग्ध निबंधक कार्यालयात पोहोच झाले. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामागे मोठी राजकीय खेळी असल्याचे सांगितले जाते. गोकुळ दूध संघावर प्रशासक आल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी केवळ वैद्यकीय कारण देत गोकुळचा कारभार पाहण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. यावरूनच गोकुळ दूध संघाच्या नेत्यांचा किती दबाव अधिकाऱ्यांवर असू शकतो? याचं आणखीन एक उदाहरण समोर आले आहे.

Gokul Dudhsang 2026
Manoj Jarange : मनोज जरांगे तयारीला लागताच सरकारला खडबडून जाग; 3 कॅबिनेट मंत्री अन् एका आमदारांकडे सोपवलं 'मिशन अंतरवाली सराटी'!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळ दूध संघाची निवडणूक 60 दिवसात घ्यावी लागणार आहे. तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडून पावसाळ्यातील संस्थांना मतदानाचा अधिकार देताना त्या संदर्भात तक्रार आली असेल तर वस्तुस्थितीच्या आधारे त्यांना अधिकार द्यावेत अशा सूचना न्यायालयाने केले आहेत. तत्पूर्वी प्रारूप यादीवर हरकती आल्याने त्याची चौकशी आज देविदास मिसाळ यांच्या उपस्थितीत होणार होती. मात्र या तडकाफडकी बदली वरून आता गोकुळ मधील पात्र अपात्र संस्थेवरून पुन्हा एकदा महायुती मधील राजकीय वातावरण तापणार आहे. सुनावणीनंतर आता किती संस्थांना मतदानाचा अधिकार मिळणार हे अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच समजणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com