Gokul News: 'गोकुळ'च्या निवडणुकीचा गुंता वाढला, आता राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर ठरणार 1200 सभासदांचे भवितव्य

Gokul 1200 Member Disqualification: राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दिले आहेत. त्या 25 मार्चला त्याबाबत सुनावणी होणार असून आता गोकुळ दूध संघाची निवडणूक ही पावसाळ्यानंतरच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Gokul Dudh Mahasangh
Gokul Dudh MahasanghSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे सुरू असलेल्या बाराशे दूध उत्पादक सभासदांना अपात्र करण्यासंदर्भात याचिकेत झालेल्या सुनावणी दरम्यान सर्किट बेंचकडून राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दिले आहेत. त्या 25 मार्चला त्याबाबत सुनावणी होणार असून आता गोकुळ दूध संघाची निवडणूक ही पावसाळ्यानंतरच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

गोकुळ दूध संघातील बाराशे दूध उत्पादक संस्था सभासदांना अपात्र करण्याच्या मुद्यावरून सध्या गोकुळची निवडणूक प्रक्रिया गाजत आहे. हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे या संदर्भात वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल केली आहे.

त्यामधील काही सभासद भोगस असल्याचा दावा करत ते अपात्र करण्याची मागणी बेलवाडे यांनी केली आहे. या संस्थांना अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संदर्भ त्यांनी दिले. येथे सुनावणी सुरू असतानाच गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथील निकालानंतर आज सर्किटबेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तीनी सरकारी पक्षाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

Gokul Dudh Mahasangh
Rupali Chakankar controversy : अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांचं पद जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केलं क्लिअर...

दरम्यान, सध्या दुग्ध विभागाच्या कार्यालयात सुमारे हजाराहून अधिक दूध संस्थांनी दाखल केलेले तक्रार अर्ज पडून आहेत. त्याबाबत नेकमे काय करायचे याबाबत दुग्ध विभाग संदिग्ध आहे. आता न्यायालयाच्या निकालाची दुग्ध विभागालाही प्रतीक्षा आहे.

सत्र न्यायालयाकडून निकाल येत नाही, तोपर्यंत पात्र सभासदांची प्रारूप मतदार यादी जाहीर करता येणार नाही. त्यामुळे पात्र सभासदांकडून कोणत्या व्यक्तींकडून ठराव घ्यायचे, हे निश्चित झाल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा तुला टप्पा पार पडतो. दुग्ध विभागाकडून सभासदांकडून ठराव मागितले जातात.

साधारण 30 दिवसांचा कालावधी ठराव जमा करण्यासाठी जातो. त्यानंतर साधारण तीस दिवस छाननी, हरकत घेण्यासाठी असतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर पावसाळ्यात मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com