Gokul Election Result: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या पराभवाची ही आहेत 'पाच' मुख्य कारणं

Gokul Election Result: जिल्ह्यामध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र असताना, महायुतीचे तब्बल १० आमदार असताना आणि दोन खासदार असताना सतेज पाटलांनी गोकुळची सत्ता खेचून आणून जबरदस्त कामगिरी केली आहे.
Gokul Election 2026 : Mahayuti Meeting
Gokul Election 2026 : Mahayuti Meeting
Published on: 
Updated on: 

Gokul Election Result: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील याच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं एकूण २५ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या पारड्यात ११ जागा पडल्या. जिल्ह्यामध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र असताना, महायुतीचे तब्बल १० आमदार असताना आणि दोन खासदार असताना सतेज पाटलांनी गोकुळची सत्ता खेचून आणून जबरदस्त कामगिरी केली आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यासाठी तब्बल ९९.९६ टक्के मतदान झालं. पण महायुतीतील वाद आणि अनेक चुकांची किंमत त्यांना मोजावी लागली आहे. महायुतीच्या पराभवाची ही पाच कारणं महत्वाची ठरली आहेत.

जागा वाटपावरून दीर्घकाळ मतभेद

गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील (भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार NCP, जनसुराज्य) पक्षांमध्ये जागा वाटपावरुन बराच वाद झाला, काही महिने यावरुन वाद सुरुच होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा जागावाटपाचा तिढा सुटला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधीक ९ जागा आल्या. तर भाजपच्या आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी ७ जागा आणि जनसुराज्यला २ जागा असा फॉर्म्युला ठरला होता, पण हे सर्वकाही शेवटच्या टप्प्यात झाल्यानं यामुळं महायुतीतील पक्षांमध्ये एकजूट दिसून आली नाही, तसंच प्रचारात अनेक अडथळे निर्माण झाले होते.

तिकीट वाटपात नाराजी

महायुतीतील वादात अनेक इच्छुक आणि माजी संचालकांचा पत्ता कट झाला. यामध्ये पी. एन. पाटील गटाला फार कमी जागा मिळाल्या. यामुळं इथं नाराज झालेले घटक सतेज पाटील गटाकडे झुकले यांच्याकडून क्रॉस व्होटिंगही झाल्याची चर्चा आहे. महायुतीतील घटक पक्षांतही स्थानिक स्तरावर एकात्मता नव्हती. त्याचा फटका महायुतीला बसला.

सतेज पाटील यांचा प्रभावी प्रचार

सतेज पाटील यांनी गोकुळचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य या मुद्द्यांवर कोल्हापुरकरांच्या अस्मितेचा प्रचार केला. म्हणजेच गोकुळचा गुजरातच्या अमूल प्रमाणं मल्टीस्टेट करण्याचा सरकारचा कथित डाव असल्याचा प्रचार केला. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि स्थानिक नियंत्रणाचा मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचला. त्यांच्या पॅनेलने काही तालुक्यांत (पन्हाळा, गगनबावडा इ.) जोरदार मुसंडी मारली.

मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग

मतमोजणीदरम्यान अनेक तालुक्यांमध्ये (विशेषतः राधानगरी, करवीर, पन्हाळा इ.) ठरावधारकांनी दोन्ही पॅनेलमधील उमेदवारांना मते दिल्याची चर्चा होती. अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य आणि किरकोळ फरकाने अनेक जागा गमावल्या गेल्या. महायुतीला गमवाव्या लागल्या.

प्रमुख चेहऱ्यांचे पराभव

नविद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांसारख्या बड्या नेत्यांचा पराभव झाल्याने महायुतीला धक्का बसला. मतदारांनी प्रस्थापित चेहऱ्यांऐवजी नव्या किंवा समविचारी उमेदवारांना पसंती दिल्याचं या निवडणुकीतून दिसून आलं. जनसुराज्यच्या बालेकिल्यातही अपेक्षित यश मिळाले नाही.

ही निवडणूक केवळ दूध संघाच्या सत्तेपुरती नव्हती, तर कोल्हापूरच्या सहकार आणि राजकीय समीकरणांची कसोटी होती. महायुतीने क्लीन स्वीपचा दावा केला होता, पण स्थानिक गणिते आणि क्रॉस व्होटिंगने चित्र बदलले आणि महायुतीची राज्यात सत्ता असताना तसंच जिल्ह्यात १० आमदार असताना, दोन खासदार प्रचारात उतरलेले खुद्द मुख्यमंत्री कोल्हापुरात असतान सतेज पाटलांनी हा विजय अक्षरशः खेचून आणला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com