Gokul Election News : गोकुळ दूध संघाचं अंतिम जागावाटप ठरलं, CM फडणवीसांचा ग्रीन सिग्नल : राष्ट्रवादी, भाजपसह कोणाला किती जागा?

Mahayuti Seat Sharing: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अखेर महायुतीच्या नेत्यांना निरोप धाडला आहे.
Gokul Milk Union election.
Gokul Milk Union election.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (3 ऑक्टोबर) रात्री उशीरा महायुतीच्या नेत्यांना याबाबतचा निरोप पाठवला. राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. त्यांना 9 जागा देण्यात आल्या असून त्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचा समावेश आहे. भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 7 आणि जनसुराज्य शक्तीसाठी 2 अशा फॉर्म्युल्याला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती म्हणून राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने मोट बांधली आहे. मात्र, जागा वाटपाचा निर्णय कोल्हापुरात होऊ शकला नाही. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. तेथे चर्चा झाली, मात्र निर्णय नंतर दिला जाईल, असे ठरले होते. त्याबाबतचा निर्णय शनिवारी (3 ऑक्टोबर) रात्री झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

गोकुळच्या निवडणुकीबाबत मुंबईत रात्री उशिरापर्यंत घडामोडी सुरू होत्या. अखेर नऊनंतर हा फॉर्म्युला संबंधितांना कळविण्यात आल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. संचालकांच्या २५ जागांसोबत उर्वरीत दोन स्वीकृत सदस्य आणि एक शासन नियुक्त अशा तीन जागांमध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा प्रमुख तीन पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे निश्‍चित झाल्याचेही समजते.

Gokul Milk Union election.
Nagpur MLC Election: मोठी बातमी: नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; शरद पवारांचा लाडका नेता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

दरम्यान, शासन नियुक्त संचालकाची आणखी एक जागा वाढण्याची शक्यता आहे. ही अतिरिक्त जागा मंजूर झाल्यास ती जनसुराज्य शक्तीला देण्याबाबत महायुतीत चर्चा असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाच्या अंतिम सूत्रात बदल न होता जनसुराज्याला अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व जागांबाबत अधिकृत निर्णय झाला असला तरीही कोणत्याही पक्षाने किंवा खुद्द मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com