

Gokul Election: गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विश्वास आबाजी पाटील हेच गोकुळचे बाप असल्याचे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. डोंगळे यांच्यावर झालेल्या चौफेर टीकेनंतर या व्हिडिओ संदर्भातील स्पष्टीकरण दिले होते. मात्र ज्या विश्वास पाटलांना गोकुळचे बाप असे डोंगळे यांनी म्हटले, त्याच विश्वास पाटलांनी डोंगळे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक आणि खरी ताकद आहे. स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या विचारांच्या तालमीत आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत. त्यांनी घालून दिलेले सहकाराचे संस्कार, कामाची पद्धत आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवण्याचा विचार हाच आमच्या कार्याचा पाया आहे. त्या विचारांवरच गोकुळची सर्वांगीण प्रगती करणे आणि दूध उत्पादकांचे हित जपणे, हीच आमची भूमिका राहील असे विश्वास पाटील यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, विविध दूध उत्पादक संस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून त्याचबरोबर ती मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाला पात्र ठरत गोकुळच्या चौफेर प्रगतीसाठी सातत्याने काम करणे, दूध उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि संस्थेची विश्वासार्हता अधिक बळकट करणे हेच माझे ध्येय राहील.
ठराव दाखल करण्यासाठी गेलो असताना माझ्या समवेत असलेल्या सहकाऱ्यांनी माझ्याविषयी व्यक्त केलेली मते ही त्यांच्या मनातील आदर, आत्मीयता आणि अनेक वर्षांच्या स्नेहपूर्ण सहवासातून व्यक्त झालेल्या भावना आहेत. त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊन नये. त्या विषयावर अधिक भाष्य करण्यापेक्षा दूध उत्पादकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणे आणि गोकुळच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणे हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.