Gokul Election : ए वाय पाटलांचा मास्टरस्ट्रोक, मेळाव्यातून दाखवला दम : फलकावर सतेज पाटलांचा फोटो गायब, मुश्रीफांनाही वगळलं

No Photograph On Banner Satej Patil and Hasan Mushrif In A Y Patil Gokul Election Gathering : गोकुळच्या निवडणुकीला वेग आला असून आता महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये ठराव दाखल करण्याची धांदल उडाली आहे.
A Y Patil Gokul Election Gathering
A Y Patil Gokul Election Gatheringsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gokul Election Politics : महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये ठराव एकत्र करण्याची धांदल सुरू असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील मात्र या सर्वांपासून अलिप्त राहिले. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातून तब्बल 204 ठराव गोळा करत तालुक्यातील सर्वाधिक ठराव असल्याचा दावा ए. वाय. पाटील यांनी केला आहे.

दरम्यान आयोजित केलेल्या मेळाव्यात फलकावर ना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा फोटो होता ना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो होता. स्वतंत्र मेळावा घेत आपला राधानगरी तालुक्यातील दम दाखवला आहे.

मेळाव्यात बोलताना ए. वाय पाटील यांनी, दूध उत्पादक आणि प्रामाणिक सभासदांच्या जीवावर आपण निवडणुकीला समोर जायचं आहे. पूर्वी काँग्रेसचं तिकीट दिल्लीतून मिळायचं. मी 1992 साली तिकीट आणलं आणि माझ्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती.

A Y Patil Gokul Election Gathering
Gokul: गोकुळच्या मैदानात महायुतीतील 'मोठा भाऊ' कोण? मुश्रीफांचा दावा, महाडिकांचा पलटवार, चंद्रदीप नरकेंचा दोघांनाही टोला

मला कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य कुटुंबातील व्यक्तीला इथल्या सामान्य जनतेने श्रेय दिले. राधानगरी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादावर माझं राजकारणात पदार्पण केले असल्याचे स्पष्टीकरण ए. वाय. पाटील यांनी दिले. कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न मी गोकुळच्या मागील निवडणुकीत केला.

मला अनेक जन सांगत होते तुम्ही चूक करू नका. पण मला त्या गोष्टीचा आज पश्चाताप होतं आहे. माझी संचालक किसन चौगुले यांच्याबाबत विधानसभा केले. आज राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक ठरावं माझ्याकडे आहेत. माझ्याकडे 204 सभासदांनी दाखल केले आहेत. सभासदांनी विश्वास ठेवला म्हणून मी स्वतंत्र मेळावा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचा ए. वाय. पाटील यांनी स्पष्ट केले.

A Y Patil Gokul Election Gathering
Gokul Milk Election: गोकुळच्या राजकारणात खळबळ! ऐन निवडणुकीत 427 दूध संस्थांवर कारवाई; सर्वपक्षीय नेत्यांना धक्का

काही जणांनी मला जिल्ह्यात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याला राधानगरी करांनी उत्तरे द्यावे. दूध उत्पादक यांची प्रगती हाच डोळ्यासमोर उद्देश आहे. सध्याच्या घडीला आपण स्वतंत्र मेळावा घेत आहोत. पण वेळ आणि काळ आल्यावर आपण कोणासोबत जायचे याचे उत्तर लवकरच देईल असे देखील ए. वाय. पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com