Gokul Milk Dairy: महाडिकांची टीका मुश्रीफांवर, प्रत्युत्तर दिलं बंटी पाटलांनी...; मैत्रीचं गणित समझेना!

Mahadevrao Mahadik criticism on Hasan Mushrif: मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याची हालचाल होण्याची शक्यता महाडिक गटाकडून व्यक्त केली जात आहे.
Satej Patil
Satej Patil sarkarnama
Published on
Updated on

✅ 3-Point Summary

  1. सत्ताधाऱ्यांत आणि विरोधकांत वाद – गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीतील अंतर्गत संघर्षातून नविद मुश्रीफ अध्यक्ष झाले, तर संचालक वाढीच्या निर्णयावरून महाडिक गट आक्रमक झाला आहे.

  2. महाडिक विरुद्ध मुश्रीफ-पाटील मैत्री – माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी संचालक वाढ, टोकन वितरण यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली; मात्र सतेज पाटील यांनी त्यावर महाडिकांनाच लक्ष्य केलं.

  3. राजकीय मैत्री आणि सावध भूमिका – मंत्री मुश्रीफ संयमित भूमिका घेत विरोधकांना समजवण्याची तयारी दाखवत आहेत, तर सतेज पाटील आक्रमकपणे महाडिकांवर टीका करत आहेत.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आत्तापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाची ईर्षा पाहायला मिळते. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरूनच झालेल्या महायुतीतील सत्ता संघर्षात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

त्यानंतर गोकुळमध्ये संचालक वाढीचा मुद्दा पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कळीचा मुद्दा ठरत आहे. संचालक मंडळांनी संचालक वाढीचा निर्णय घेतल्यानंतर गोकुळच्या संचालिका आणि महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी या निर्णयावर आवाज उठवला. इतकेच नव्हे तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गोकुळमधील कारभारावर ताशेरे ओढले.

सध्या गोकुळ मधील सभासदांना देण्यात येणाऱ्या टोकनचा विषय चर्चेत आहे. जर गोकुळ मधील कारभार इतकाच स्वच्छ असेल तर टोकन देण्याची गरज काय? असा सवाल थेट माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना केला आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांची सावध भूमिका अध्यक्ष निवडीच्या मागे राहिले. त्याच पद्धतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांची देखील सावध भूमिका आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजाराम कारखान्यावर बैठक घेतल्यानंतर प्रसंगी संचालक वाढीच्या मुद्द्यावर दिल्लीपर्यंत धडक मारू असा इशारा मंत्री मुश्रीफ यांना निवडणुकीच्या तोंडावर दिला आहे. मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याची हालचाल होण्याची शक्यता महाडिक गटाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र महाडिक आणि पाटील यांच्यातील सत्ता संघर्ष पाहता गोकुळमधील पुढील निवडणूक ही अत्यंत टोकाची समजली जाते. तर मंत्री मुश्रीफ आणि पाटील यांची मैत्री लक्षात घेता महाडिक गट सुरुवातीपासूनच मंत्री मुश्रीफ यांना निशाण्यावर घेण्याच्या तयारीत आहेत.

Satej Patil
Manikrao kokate: मला रमी खेळताच येत नाही, मला बदनाम करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार; कोकाटे संतापले

दुसरीकडे मंत्री मुश्रीफ देखील ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळताना दिसत आहेत. अध्यक्ष निवडीनंतर संचालक वाढीचा मुद्दा विरोधकांसाठी विरोधाचा असला तरी महायुती म्हणून हा निर्णय कसा फायद्याचा? हे महाडिकांना समजून देण्याची तयारी मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त करून दाखवली आहे. दुसरीकडे गोकुळ मधील मंत्री मुश्रीफ यांचे सहकारी आमदार सतेज पाटील यांनी मात्र संचालक वाढीच्या निर्णयाला सहमती दिली असून टोकनच्या संदर्भात थेट महाडिक यांच्यावरच टीका केली आहे.

गोकुळमधील कारभार सध्या मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडे आहे. त्यामुळे सहाजिकच मुश्रीफ यांच्यावर दाखवलेले बोट हे पाटील गटाकडे दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मैत्रीची किनार पाहता तिकडे मंत्री मुश्रीफ संयमाने महायुतीतील राजकारण सांभाळताना दिसतात. तर दुसरीकडे सतेज पाटील थेट मैदानात विरोधकांचा सामना करताना दिसतात.

महाडिकांना समजवून सांगू: मुश्रीफ

गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन करण्याची भूमिका घेतली होती. त्याचवेळी महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवण्याचे ठरलं आहे. याबाबत काही लोकांच्या शंका आहेत. त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. गोकुळचे संचालक वाढवण्याचे नेमके कारण काय? हे आपण महाडिक यांना समजावून सांगू. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गोकुळचे संचालक असावेत ही आमची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

महाडिकांनी टोकणचे वक्तव्य करणे विनोद : सतेज पाटील

गोकुळची उलाढाल चार हजार कोटींवर गेली आहे. व्याप्ती वाढलेली आहे. केडीसीसीमध्ये संचालक वाढीचा निर्णय घेतल्याने ठेवी आणि व्याप्ती वाढली.गोकूळ चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी संचालक वाढीच्या निर्णायाची मदत होईल. मात्र तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना अशी अवस्था महायुतीची झाली आहे.

महाडिक साहेबांनी गोकूळ संदर्भात टोकणचं वक्तव्य करणं म्हणजे विनोद आहे. त्यांनी आजपर्यंत काय राजकारण केलं.पूर्वी संघटनात्मक राजकारण होतं.ताकदीचं,पक्षाचं राजकारण होतं, याला खीळ कोणी बसवली. कोल्हापूर जिल्ह्यात पैशाचं राजकारण कोणी आणलं ,कोणी सुरू केलं याचा इतिहास त्यांनी तपासावा, अशी थेट टीका आमदार सतेज पाटील यांनी केला

 4 FAQs with One-Line Answers:

Q1. गोकुळ दूध संघातील सध्या कोणत्या मुद्द्यावर वाद सुरू आहे?
संचालक वाढीचा निर्णय आणि टोकन वाटप हे मुख्य वादाचे मुद्दे आहेत.

Q2. नविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष कसे झाले?
महायुतीतील अंतर्गत सत्ता संघर्षानंतर नविद मुश्रीफ यांना अध्यक्षपद मिळाले.

Q3. महाडिक गटाचे आरोप काय आहेत?
महाडिक गटाने गोकुळ कारभार अपारदर्शक असून संचालक वाढ अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.

Q4. सतेज पाटील यांचे यावर काय मत आहे?
सतेज पाटील यांनी महाडिकांच्या आरोपांना विनोदी विधान म्हणत गोकुळची विस्तारलेली व्याप्ती दाखवून समर्थन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com