Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाचा कंडका पडणार : महायुतीच्या नेत्यांची गोव्यात बैठक...

Mahayuti Meeting for Gokul Election : गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी समविचारी आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अशातच आता गोव्यात होणाऱ्या बैठकीत संचालकांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
 Satej Pati Gokul Election
Satej Pati Gokul Electionsarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 28 Oct : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून कोल्हापूरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेत सहभागी व्हायचे की अनुपस्थित राहायचे, याबाबत महायुती आज महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.

यासाठी महायुतीचे जिल्ह्यातील नेते आज गोव्यामध्ये बैठक घेणार आहेत. गोव्याच्या सहलीवर गेलेल्या संचालकांसोबत दुपारी एक वाजता ही बैठक होणार असून, आज संध्याकाळपर्यंत निवडीच्या सभेत सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी समविचारी आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महायुतीच्या गोटात विविध पर्यायांवर चर्चा सुरू झाली होती. आता गोव्यात होणाऱ्या बैठकीत संचालकांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीच्या सभेबाबत महायुती काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Satej Pati Gokul Election
Shalarth ID Scam : शिक्षण विभागाने तब्बल 530 शिक्षकांना पाठवले घरी; 160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा भोवला

दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी सहकार्य मिळावे यासाठी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांना केवळ फोनवरील चर्चेऐवजी सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी, अशी अपेक्षा असल्याचे समजते.

 Satej Pati Gokul Election
Drought Relief Subsidy 2026: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची मदत! कोणाला पैसे मिळणार, कोण वंचित राहणार; निकष काय?

त्यामुळे आता सतेज पाटील महायुतीच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गोव्यातील बैठकीत महायुतीचे संचालक अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहण्याबाबत काय निर्णय घेतात आणि सतेज पाटील यांच्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळतो का, यावर गोकुळच्या अध्यक्ष निवडीचे पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com