Gokul President : अखेर गोकुळचे अध्यक्ष शशिकांत पाटील चुयेकरच; नाट्यमय घडामोडीनंतर समांतर सभेत समविचारी आघाडीकडून निवड

Gokul President Election Latest News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या असून कोरम सभा तहकूब करण्यात आली आहे.
Gokul President Election Controversy; Shashikant Patil Chuyekar
Gokul President Election Controversy; Shashikant Patil ChuyekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज (ता. २९) आयोजित केलेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. त्यामुळे शशिकांत पाटील-चुयेकर यांची अधिकृत सभेतून अध्यक्षपदी निवड होऊ शकली नाही. दरम्यान, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. ही निवड कायदेशीर असल्याचेही आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी म्हटले आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे समविचारी आघाडीचे पारडे जड झाले आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने अध्यक्ष निवडीचा पेच कायम आहे.

दरम्यान, सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, नंदुरबार येथे बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सहकार्य करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते.

Gokul President Election Controversy; Shashikant Patil Chuyekar
Gokul President Election : हातातोंडाचा घास महायुतीने पुन्हा हिरावला, गोकुळ संघाच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटलांच्या पदरी पुन्हा निराशा

आजच्या सभेत आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने निवडणूक अधिकारी तथा करवीर विभागाच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. समविचारी आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली होती. यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनही दिले. मात्र, कोरम पूर्ण नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय कायम ठेवला.

Gokul President Election Controversy; Shashikant Patil Chuyekar
Gokul president: गोकुळच्या 'अध्यक्ष'पदाला अडथळा, महायुती धोक्यात? जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचित संचालक अभिजित तायशेटे यांनी याबाबत माहिती दिली. बहुमत असूनही कोरमअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे नेली नाही, त्यामुळे समांतर सभा घेऊन निवड केल्याचे त्यांनी सांगितले. ही निवड कायदेशीर असल्याचा दावाही तायशेटे यांनी केला. दरम्यान, समांतर सभेत झालेल्या निवडीला अधिकृत मान्यता मिळते का आणि गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा कसा सुटतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com