Gokul Politics : 'गोकुळ'मध्ये प्रशासक अटळ! सर्किट बेंचच्या निर्णयाने विद्यमान संचालकांच्या मुदतवाढीला ब्रेक; सत्ताधाऱ्यांना झटका

Gokul Election Politics : येत्या चार मे ला गोकुळमधील विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार असून मुदतवाढ द्यायला कोल्हापूर सर्किट बेंचने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
Gokul Politics
Gokul PoliticsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मुंबई उच्च न्यायालयाने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिला

  2. चार मे रोजी मुदत संपत असल्याने गोकुळवर प्रशासकराज लागू होण्याची शक्यता

  3. प्रशासक नियुक्तीमुळे निवडणूक किमान चार महिन्यांनी पुढे ढकलली जाऊ शकते

kolhapur Gokul Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तंग झाले आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपणार आहे. यामुळे येथे प्रशासक येऊ नये यासाठी सत्ताधारी मुंबई दौरे करताना दिसत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रशासक येईलच अशी तंबी दिली आहे. यामुळे महायुतीतच मतभेद असल्याचे उघड झाले आहे. अशातच आता कोल्हापूर सर्किट बेंचने सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. संचालक मंडळाला मुदतवाढ द्यायला कोल्हापूर सर्किट बेंचने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता गोकुळवर प्रशासक अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर गोकुळची निवडणूकही पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

गोकुळ अध्यक्षपदाचा वाद मुंबई दरबारी गेला होता. त्यानंतर आता होऊ घातलेल्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या रणकंदनाचा वाद देखील मुंबईत पोहचला आहे. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर प्रशासक आणू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

यासाठी सत्ताधाऱ्यांचे नेते आणि अध्यक्ष संचालक मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजा संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच गोकुळ दूधसंघाच्या संचालकांना मुदतवाढ द्यावी किंवा अशासकीय प्रशासक नेमवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर केली.

Gokul Politics
Gokul Politics : फडणवीस- शिंदेचं बिनसलं? साताऱ्यानंतर गोकुळच्या राजकारणात शिंदेंच्या शिवसेनेला गृहीत न धरण्याचे संकेत

पण मुख्यमंत्र्यांनी थेट नव्या कायद्यातील तरतुदीनुसार गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक नेमला जाईल, असे सांगून हा विषय संपवला. शिवाय आवसायानात निघालेल्या ११०८ संस्थांची कायदेशीर चौकशी पूर्ण होऊ दे. तोपर्यंत प्रशासक नेमला जाईल, असेही सांगितले. यामुळे गोकुळ दूध संघावर प्रशासक आणू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईत जोरदार झटका बसल्याची चर्चा आहे.

अशा चर्चा जिल्ह्यात सुरू असतानाच सत्ताधाऱ्यांना दुसरा धक्का मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या नकारामुळे आता गोकुळवर प्रशासकराज अटळ असून विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपताच गोकुळवर प्रशासकाची नियुक्ती होईल.

चार मे रोजी गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार असून प्रशासकाची नियुक्ती झाल्यास दूध संघाची निवडणूकही पुढे ढकलली जाणार आहे. जी किमान चार महिने पुढे जाऊ शकते. सर्किट बेंचकडे सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती. जी न्यायालयाने फेटाळत संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Gokul Politics
Gokul Politics : शौमिका महाडिक, बेलवाडे गोकुळचे प्रशासक? मे महिन्यात राजकारण आणखी तापणार

FAQs :

1. गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ का मिळाली नाही
मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळल्यामुळे मुदतवाढ नाकारली गेली

2. गोकुळवर प्रशासकराज का लागू होणार आहे
मंडळाची मुदत संपत असून नवीन मुदतवाढ न मिळाल्यामुळे प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे

3. गोकुळ निवडणूक कधी होणार
प्रशासक नियुक्तीनंतर किमान चार महिन्यांनी निवडणूक होण्याची शक्यता आहे

4. न्यायालयात काय आरोप झाले होते
याचिकाकर्त्यांनी गोकुळने न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे

5. या निर्णयाचा सहकारी क्षेत्रावर काय परिणाम होईल
यामुळे सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com