Gokul Election 2026 : बिगुल वाजला... गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची घोषणा, वाचा संपूर्ण वेळापत्रक...

Gokul Election, Gokul Milk Union, Kolhapur District Milk Producers Union : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोककुमार गाडे यांनी मंगळवारी निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली. त्यानुसार आज हा कार्यक्रम जाहीर.
Kolhapur Gokul Election 2026
Kolhapur Gokul Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gokul Election : संपूर्ण राज्याचे व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषद घेत हा कार्यक्रम जाहीर केला. येत्या 18 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून गोकुळसाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान, तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दरम्यान, अंतिम मतदार यादीचा घोळ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोककुमार गाडे यांनी मंगळवारी निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली. त्यानुसार आज हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. रमणमळा येथील बहूउद्देशीय हॉल येथे गोकुळ दूध संघांचे निवडणूक कार्यालय असेल. त्याठिकाणी अर्ज भरता येणार आहेत.

Kolhapur Gokul Election 2026
Assembly Election news : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी; ममतादीदींची प्रतिष्ठा पणाला, भाजपचा डाव फसणार की गड मजबूत होणार?

गेल्या महिन्यात दोन महिन्यांपासून उमेदवारांनी संस्था सभासदांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. प्रत्येक तालुका आणि तालुक्यातील दुर्गम भागातील संस्थांच्या गाठीभेटी घेण्यासाठी नेत्यांची धांदल सुरू आहे. 6 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने तब्बल 11 दिवस प्रचार कालावधी मिळणार आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील हालचालींना आता वेग येणार आहे. शिवाय काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची एकतर्फी फाईट महायुतीचा चांगलीच महागात पडणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात उमेदवारांची जुळवाजुळव, समीकरण आणि प्रचाराची रणनीती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur Gokul Election 2026
UP BJP Politics : उत्तर प्रदेश भाजपमध्ये मोठी खळबळ; पक्षांतर्गत सर्व्हेने वाढविले टेन्शन, 125 आमदारांना बसणार झटका

सध्या महायुतीमध्ये इच्छुकांची स्पर्धा सुरू आहे. शिवाय महायुतीमध्ये जागा वाटपासाठी अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे. त्यातून कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची किंवा कार्यकर्त्याला संधी द्यायची याचं आव्हान नेत्यांसमोर असणार आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

१५ ते २२ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे

२३ सप्टेंबर - अर्जांची छाननी होणार

२४ सप्टेंबर - वैध अर्जांची यादी प्रसिद्ध

२५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर - अर्ज माघार

९ ऑक्टोबर - उमेदवार अंतिम यादी

१८ ऑक्टोबर - मतदान

१९ ऑक्टोबर - निकाल

गोकुळमध्ये यंदा क्रियाशील सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी - सामान्य प्रवर्गातून - 20, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी -1 , महिला प्रतिनिधी -2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी -1, भटक्या व विमुक्त जाती जमाती मधून 1 असा 25 संचालकांचा समावेश असणार आहे. तर स्वीकृत संचालकांमध्ये एक तज्ञ संचालक, एक शासन नियुक्त संचालक, तर तिसरा कार्यकारी संचालक निवडण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com