Gokul: विश्वास पाटील 'गोकुळचे' बाप', 'आम्ही जिथे, विजय तिथे' : ठरावावेळ भाजप नेत्यांनी दांडी मारताच अरुण डोंगळेंची टोलेबाजी

Gokul Milk Union, Kolhapur News, Mahayuti: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मतभेद पुन्हा समोर आले. भाजप संचालकांच्या अनुपस्थितीत अरुण डोंगळे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.
Politics of "Gokul": Heal yesterday's confusion over today's spectacle
Politics of "Gokul": Heal yesterday's confusion over today's spectacleSarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी ठराव दाखल केले. यावेळी महायुतीतील सर्वपक्षीय संचालकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे संचालक दिसले. मात्र भाजप आणि जनसुराज्य शक्तीचे संचालक उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहे. इतकेच नव्हे तर माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत आणखी वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठराव दाखल करण्यासाठी आज माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, नावेद मुश्रीफ, विश्वास पाटील आणि वीरेंद्र मंडलिक, माजी संचालक अजित नरके उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना अरुण डोंगळे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. "आबाजी हे गोकुळचे बाप आहेत. आणि आता मी आबाजींसोबत आहे. लहान मोठ्या भावाचं होतं राहायचं. पण आम्ही दोघे ज्या बाजूला, त्या बाजूचा विजय निश्चित आहे", असे सूचक विधान करत भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

Politics of "Gokul": Heal yesterday's confusion over today's spectacle
Gokul Election: भाजपचा डाव महायुतीवर उलटला! मुश्रीफ-सतेज पाटील यांचेही मनसुबे उधळले; गोकुळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना अरुण डोंगळे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या टिकेचा समाचार घेतला. डोंगळे यांनी सतेज पाटलांवर पलटवार करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा गोकुळचे निर्णय घेण्यासाठी आम्हाला थेट दिल्लीला जावे लागायचे. मग आता तुम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानाची आणि स्थानिक भाषेची भाषा कशी काय करता? असा बोचरा आणि थेट सवाल डोंगळेंनी उपस्थित केला.

मागील विश्वास पाटील दोन वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. ते शिवसेनेचे आहेत. मी देखील दोन वर्ष अध्यक्ष असून राष्ट्रवादीचा आहे. आणि शेवटच्या वर्षात देखील नवीन मुश्रीफ हे अध्यक्ष झाले ते देखील राष्ट्रवादीचे असल्याने मागील पाच वर्षात गोकुळला महायुतीची सत्ता होती. असे विधान केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com