Gokul election: 'गोकुळ’च्या एका मतासाठी लाखोंची तयारी, सहलींचं नियोजन : नवरात्रीमुळे ठरावधाकांचा नकार, नेत्यांची डोकेदुखी वाढली

Gokul election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावधारकांना सहलीवर नेण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, नवरात्र आणि दसऱ्यामुळे ठरावधारक गावातच थांबण्यास पसंती देत असल्याचे चित्र आहे.
Gokul election
Gokul electionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul election News: गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीची तारीख जवळ येत असून या पार्श्वभूमीवर ठरावधारकांची मनमर्जी ठेवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरात प्रयत्न सुरु आहेत. गोकुळ'च्या निवडणुकीत ठरावदारांचे महत्त्व कमालीचे आहे. प्रत्येक मतासाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सहलीतून ठरावदारांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली जात आहे.

या निवडणूकीत प्रत्येक ठराव धारकाला आपल्या सोबत ठेवण्यासाठी जवळपास दीड लाखापासून ते तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च आतापासूनच केला जात आहे. ठराव धारकांना सहलीच्या माध्यमातून ऐशो आरामात प्रवासाचा आनंद देऊन मत पदरात पाडून घेण्याची रणनीती आखली जात आहे. मात्र दसरा आणि नवरात्रीच्या मुहुर्ताने या नियोजनाची कोंडी केली आहे.

'गोकुळ' निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. महायुती आणि समविचारी, अशा दोन्ही पॅनेलकडून आपापला अजेंडा ठरावदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूध उत्पादकांचे प्रश्न, दूध संकलन, दूध दर आणि संघाच्या कारभारावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठरावदारांना आपल्याच गोटात ठेवण्यासाठी धडपड वाढली आहे.

Gokul election
Pune ZP budget news : तोंडी आदेशाने 75 कोटी राखीव; पुणे झेडपीत निधीचे गूढ कायम! आदेश कुणाचा?

गोकुळ दुध संघाच्या २५ संचालकपदांसाठी महायुती आणि समविचारी या दोन गटांमध्ये मुख्य लढत आहे. १८ ऑक्टोबरला यासाठी मतदान होणार असून १९ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदानाची हमी मिळविण्यासाठी ठरावदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी संबंधित नेते आणि पदाधिकाऱ्यांवर ठरावदारांची मनधरणी करण्याची जबाबदारी दिली आहे.

Gokul election
पोलिसांकडूनच CDR विक्री? पैशांसाठी कॉल डिटेल्स लीक होत असल्याचा गंभीर आरोप; नागरिकांच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर

महापालिका नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सदस्य, पदाधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक तसेच गावागावांतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठरावदारांशी संपर्क साधला जात आहे. मात्र, सणात घरदार सोडून सहलीला जाण्याबाबत ठरावदारांत फारसा उत्साह दिसत नसल्याचे चित्र आहे. ठरावदारांचा सहलीला नकार म्हणजे संबंधित पॅनेलला नकार की केवळ सणासाठी गावात थांबण्याचा निर्णय, हे मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल. तूर्तास, 'मतदान तुम्हालाच; पण नवरात्र आमच्या गावातच', या भूमिकेमुळे निवडणुकीत सहलींच्या राजकारणापेक्षा ठरावदारांच्या विश्वासाची परीक्षा महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com