Kolhapur: गोकुळच्या निवडणुकीत सजेत पाटलांचा गेम फसणार? सत्यजीत आबांचे स्वतंत्र ठराव, ए.वाय. पाटीलही लागले तयारीला

Gokul Milk Union Election, Satej Patil, Satyajit Sarudkar: गोकुळ दूध संघ निवडणुकीत सत्यजित सरूडकर आणि ए. वाय. पाटील यांच्या स्वतंत्र ठरावांमुळे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Satej Patil
Satej Patil sarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठराव गोळा करण्याची लगबग सुरू आहे. महायुती म्हणून ही निवडणूक एकत्र लढण्याचे प्रयत्न घटक पक्षाकडून सुरू आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडी म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची गणिते अवघड होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सत्यजित सरूडकर हे स्वतंत्र ठराव दाखल करणार आहेत. याशिवाय ए. वाय. पाटील ही तयारीला लागले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित सरूडकर यांनी आपल्या गटाचे ठराव स्वतंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा काँग्रेसप्रणित समविचारी आघाडीला धक्का मानला जातो. २ जुलै रोजी ठराव दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपले ठराव आपल्या परीने गोळा करून शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्याचे नियोजन केले आहे.

Satej Patil
Gokul Election : अखेर मुख्यमंत्र्यांनी गोकुळचा कंडका पाडला! सगळं ठरलं, भाजपच होणार मोठा भाऊ, चौकशाही गुंडाळणार?

ठरावांच्या संख्येवरच उमेदवारीचे गणित अवलंबून असल्याने आपल्या सोबत कोण कोण येईल याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे सरुडकर हे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत ठराव दाखल करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी स्वतंत्र ठराव दाखल केल्याने समविचारी आघाडीत खळबळ उडाली आहे.

पाटील-सरुडकर यांना दोन्ही आघाड्यांकडून ऑफर असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मागील निवडणुकीत माजी आमदार सत्यजित सरूडकर हे महाडिक गटासोबत होते. यंदा १५३ ठराव दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून ते सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याची शक्यता होती. तर दुसरीकडे जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील महायुती म्हणून ठराव गोळा करत असताना मंत्री मुश्रीफ यांनी उमेदवारी बाबत अद्याप कोणताच निर्णय दिलेला नाही. सातत्याने ए. वाय. पाटील हे सतेज पाटील गटात सोबत असणार हे जागोजागी सांगत आहेत. पण अद्याप त्यांनी ही भूमिका जाहीर केलेली नाही. ते देखील स्वतंत्र ठराव दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Satej Patil
Gokul: गोकुळ निवडणुकीत ए. वाय. पाटलांना महायुतीत 'नो एन्ट्री' : हसन मुश्रीफांनी स्पष्ट केली भूमिका

महायुतीलाही धक्का

नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या जवळीक गेलेल्या स्वाती कोरी यांनी सोमवारी आपल्या गटाचे स्वतंत्र ठराव दाखल केल्याने महायुतीला धक्का मानला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com