

Gokul Milk Union Election: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये गेलेले कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील हे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याची चर्चा होती. त्यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याच्याही चर्चा सुरु होत्या. मात्र ते तालुक्यातून महायुतीमधून ठराव गोळा करत असल्याने पुन्हा ए. वाय. पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अखेर ए. वाय. पाटील यांचा निर्णय क्लियर कट झाल्याचे सांगण्यात येते.
सध्या ए. वाय. पाटील हे काँग्रेसमध्ये आहेत. मात्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत जाण्याची चर्चा होती. शिवाय त्यांच्याकडून उमेदवारी मिळण्याचा प्रस्ताव देखील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर ठेवला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत ए. वाय. पाटील यांची बैठक देखील झाल्याचे सांगण्यात येते. मात्र या बैठकीत गोकुळच्या निवडणुकीत महायुती मधून उमेदवारी देता येणार नसल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ए. वाय. पाटील यांना सोबत घेण्यास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचे समजते.
राधानगरी तालुक्यातून सध्या ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ए. वाय. पाटील हे महायुतीकडून उमेदवारी मिळणार म्हणून संस्थांकडून ठराव गोळा करत आहेत. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी देण्यासाठी नकार दिल्यानंतर ए. वाय. पाटील यांची भूमिका चर्चेत आली आहे. ही बाब मंत्री मुश्रीफ यांना समजल्याने झालेल्या बैठकीत त्यांना महायुतीमधून उमेदवारी देता येणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ए. वाय. पाटील हे वारंवार काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहणार असल्याचे सांगत आहे. दरम्यान मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकी संदर्भात, पाटील यांच्याशी संपर्क केला. मी जिल्हा बँकेचा संचालक आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे नेते आहेत. तालुक्यातील विविध कामासंदर्भात माझी आणि त्यांची वारंवार भेट होत असते. या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसून मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशी प्रतिक्रिया सरकारनामाशी बोलताना पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.