

Gokul News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष निवडीचा पेच कायम राहिल्याने गोकुळ दूध संघावर पुन्हा एकदा प्रशासकच कायम आहे. मागील संचालक मंडळाचा कार्यकाळ हा चार मे रोजी संपल्याने त्या दिवसांपासून गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. मात्र मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी हा प्रशासकांचा काळ संपला आहे.
सहा महिने होऊनही अजूनही अध्यक्ष निवडीचे त्रांगडे निर्माण झाल्याने अध्यक्ष निवड होईपर्यंत प्रशासकच गोकुळचा कार्यभार चालवणार आहे.
गोकुळ दूध संघाची संचालक मंडळाची मुदत चार मे रोजी संपली. त्यानंतर जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये वाढीव संस्थांचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. वाढलेल्या 1420 संस्था न्यायालयात गेल्यानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडली. निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर राज्य सरकारकडून गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आली. अ वर्ग सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाला मुदतवाढ न देण्याबाबत सहकार कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार पाच सदस्य मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती.
प्रशासक सहा महिन्याच्या आत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करून नवे संचालक मंडळ अस्तित्वात आणणे आवश्यक असते. मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी प्रशासक मंडळाची मुदत संपली आहे. गोकुळ दूध संघाचे निवडणूक देखील पार पडली आहे. मात्र गणपूर्ती न झाल्याने सभा झाली नाही. शिवाय अध्यक्ष पदाची निवड देखील रखडली आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीची पुन्हा बैठक होणार आहे. जोपर्यंत गोकुळ दूध संघावर अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत संघावर प्रशासक राजवट कायम राहण्याची चिन्हे आहेत.
तत्पूर्वी महायुतीकडून चार शासन नियुक्त सदस्य करून त्यांना मतदान करण्याचे अधिकार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर महायुतीकडून तसे प्रयत्न झाल्यास संघावर महायुतीचा अध्यक्ष होऊ शकतो. जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या चार शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचे अधिकार दिले तर अध्यक्ष निवड पुन्हा कायदेशीर कचाट्यात अडकणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दूध संघावर अध्यक्ष कोण? याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत अध्यक्ष निवड होत नाही तोपर्यंत प्रशासक कायम राहणार हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.