Padalkar On Sharad Pawar : पडळकर पुन्हा पवारांवर घसरले; एकेरी उल्लेख करत या वर्षी चौंडीत न येण्याचे कारण विचारले

गेल्या वर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती.
Sharad Pawar-Gopichand Padalkar
Sharad Pawar-Gopichand PadalkarSarkarnama

Solapur News : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी पवारांनी मस्ती केली. या वर्षी पवार का नाही आला, असा उल्लेख पडळकर यांनी आपल्या भाषणात केला आहे. (Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar)

सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे धनगर समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरही त्यांनी या वेळी सडकून टीका केली.

Sharad Pawar-Gopichand Padalkar
Ajit Pawar News : ‘लाँग मार्च’ काढून प्रश्न सुटत नसतात; अजित पवारांचा ‘CPM’च्या जे. पी. गावितांना टोमणा

ते म्हणाले की, गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिवशी पवारांनी मस्ती केली. या वर्षी पवार का नाही आला. पवार चार वेळा मुख्यमंत्री होता. बारा वर्षे केंद्रात मंत्री होता. आता आतापर्यंत होता. मागं कधी होता, मला माहिती नाही. गेल्या वर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती, त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी जागृत ठेवली पाहिजे, असं आवाहनही पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना केले.

Sharad Pawar-Gopichand Padalkar
Solapur News : बच्चू कडू वाढविणार शिंदे-फडणवीसांचे टेन्शन : सोलापुरातील तीन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार

जेजुरी देवस्थानमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्यात आला. जेजुरी संस्थान आणि पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान हे होळकरांची जहागिरी आहे. जेजुरी संस्थान येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्‌घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार, अशी पत्रिका आली. त्याच वेळी मला कळले होते की, काहीतरी मोठी गेम चालू आहे. मात्र पहाटे तरुणांना सांगून पुतळ्याचे मीच उद्‌घाटन केले. सांगलीतही तेच केले.

Sharad Pawar-Gopichand Padalkar
Raju Shetti's Big Announcement : राजू शेट्टींची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोठी घोषणा

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. रोहित पवार हे जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. रोहित पवार यांचा उल्लेख ‘माकडा’ असा करत धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात, तुला माहिती नाही का, तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोमणाही त्यांनी पवार यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com