Gopichand Padalkar: भाजपच्या पडळकरांचं लढाईआधीच 'इमोशनल' कार्ड; म्हणाले,'माझी ही शेवटची निवडणूक, मला...'

Maharashtra Assembly Election 2024 : विधानपरिषदेचे आमदार आणि भाजपचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्याच पडळकरांनी आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मोठी घोषणा केली आहे.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : विधानसभा निवडणुकीसाठीच्या लढतींचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालं आहे. काही मोजक्या जागा सोडल्या तर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून बर्यापैकी आता उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे.भाजपनेही आपल्या तिसर्‍या यादीसह एकूण 146 उमेदवारांची घोषणा केली आहे.

त्यातच आता विधान परिषदेचे आमदार आणि भाजपचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्याच पडळकरांनी आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मोठी घोषणा केली आहे.

भाजप (BJP) उमेदवार गोपीचंद पडळकरांनी सोमवारी (ता.28) आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी ते बोलत होते.मी अनेक वेळा निवडणुका लढवल्या आहेत मात्र मला एकदा जनतेतून निवडून द्या असे हात जोडून विनंती करतो अशी भावनिक साथ भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घातली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, मी लय निवडणूक लढवल्या आहेत. 2009 ची विधानसभा, 2012 ची जिल्हा परिषद, 2014 ची विधानसभा, 2019 ची लोकसभा, 2019 ची विधानसभा, आता माझी जतमधून निवडणूक आहे. पण मला एक चान्स द्या आणि जनतेतून निवडून द्या. नाही दिलं, तर मला घरातच बसावे लागेल.आणि माझी शेवटची निवडणूक आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एक संधी मला द्या, जतचे नाव महाराष्ट्रभर केलं नाही तर माझं नाव बदलेन असेही पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar
Nanded Loksabha: भाजपचं नांदेड पोटनिवडणुकीसाठी धक्कातंत्र, अशोक चव्हाणांच्या खास माणसालाच उतरवलं मैदानात; शेवटच्या दिवशी उमेदवारी

गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा केंद्रीय निवडणूक समितीचे मनःपूर्वक आभार मानले होते. माझ्यावर विश्वास दाखवून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यासमवेत 21 उमेदवारांची पक्षाकडून घोषणा करण्यात आली. या संधीचा उपयोग करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन असंही पडळकर यांनी सांगितले.

भाजपा - महायुतीच्या वतीने जत विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून आज मान्यवरांच्या उपस्थितीत मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. ही उमेदवारी म्हणजे केवळ माझी वैयक्तिक जबाबदारी नसून, आपल्या सर्वांच्या आशा, अपेक्षा आणि विकासाची वचनबद्धता आहे. जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे प्रेम आणि पाठिंबा हे माझं खरं बळ आहे. आपल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही, हे वचन देतो असंही पडळकर यांनी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com