Mumbai News : आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले हाेते. तसेच, त्यांच्यावर आमचा विश्वास नसल्याचे म्हटले होते. त्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटत आहे. त्यावर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली असून, पडळकरांचे वक्तव्य अयोग्य असून, त्यांनी अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असा सल्लाही दिला. (Padalkars should not use such language; Fadnavis's reaction to Ajit Pawar's statement)
आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. पण, उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले नव्हते. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे, अशी टीका त्यांनी केली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य हे अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं अत्यंत चुकीचं आहे. तीनही पक्षांतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तीनही पक्षांतील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सणवार काही माहिती नसतं. त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. सणावाराला कसं बोललं पाहिजे, हे त्यांना समजत नाही. काय करायचं आपण. त्यांना गणेश सुबुद्धी देईल आणि त्यापुढे ते असं बोलणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
वडेट्टीवार काय म्हणाले ?
अजित पवार हे सिंह आहेत, हे दाखविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पडळकर नावाचा चिल्लर माणूस अजितदादांना लांडगा म्हणत असेल तर अजितदादा वाघ, सिंह, हत्ती आहेत, अशी उपाधी लावून अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील, त्यावेळी ते वाघ, सिंह आणि हत्ती ठरतील, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.