Solapur Dudh Sangh : शिंदेंना अवघ्या तीन महिन्यांत दुसरा धक्का; विधानसभेतील पराभवानंतर सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळही बरखास्त

Solapur District Cooperative Dudh Sangh Dissolved : रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बरखास्त झाल्याने शिंदेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. कारण रणजितसिंह यांचा तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
Solapur Dudh Sangh-Ranjitsinh Shinde
Solapur Dudh Sangh-Ranjitsinh Shindesarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 March : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना अवघ्या तीन महिन्यांतच दुसरा धक्का बसला आहे. अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (दूध पंढरी) संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. जिल्हा दूध संघाचा कारभार हा दूध उत्पादक शेतकरी आणि दुध संघाच्या हिताचा होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, त्यामुळे शिंदेंना विधानसभेतील पराभवानंतर दूध संघ बरखास्तीचा दुसरा धक्का बसला आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (Dudh Pandhari) तीन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय मंडळात पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे हे अध्यक्ष असणार आहेत, तर दूग्ध सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक डॉ. वैशाली साळवे आणि दुग्धच्या सहकारी संस्थांचे सहकार अधिकारी व्ही. जे. वडतिले हे या प्रशासकीय मंडळात सदस्य असणार आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या कारभाराच्या विरोधात 09 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर दूध संघ बचाव कृती समितीने विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे राजकुमार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दुग्ध विभागाचे पुणे विभागीय उपनिबंधक पाटील यांची चौकशी केली होती. त्या चौकशीच्या दरम्यान संचालक मंडळालाही त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.

Solapur Dudh Sangh-Ranjitsinh Shinde
Jaykumar Gore : 'नाव गोरे, कारनामे काळे' म्हणत सोलापुरात महिला काँग्रेसकडून जयकुमार गोरेंच्या विरोधात आंदोलन

तक्रारदार सोलापूर दूध संघ बचाव कृती समितीने दूध संघाच्या कारभाराबाबत केलेल्या अकरा गंभीर मुद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. तसेच चौकशीदरम्यान, दूध संघाच्या संचालक मंडळांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. मात्र या चौकशी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक मंडळ दूध उत्पादक शेतकरी, सभासद आणि संघाच्या हिताचे काम करत नसल्याचे आढळल्याचे विभागीय निबंधक पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

दूध संघाचे संचालक मंडळ चौकशीत दोषी आढळल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७८ अ अन्वये सोलापूर जिल्हा दूध संघाचे रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश विभागीय सहनिबंधक (दुग्ध) पाटील यांनी दिले आहेत. या संचालक मंडळाच्या जागेवर दूध संघाचा कारभार पाहण्यासाठी विशेष लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ नेमले आहे.

Solapur Dudh Sangh-Ranjitsinh Shinde
Solapur Shivsena : काँग्रेसच्या मुशीत घडलेल्या अन्‌ भाजपतून आलेल्या नेत्यावर शिंदेसेनेच्या सोलापूर शहरप्रमुखपदाची धुरा

दरम्यान, रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बरखास्त झाल्याने शिंदेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. कारण रणजितसिंह शिंदे यांचा तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. विशेष म्हणजे दूध संघाचा कारभार सुधारावा यासाठी माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी प्रयत्न झाले होते. मात्र, मुलाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त झाल्याचे बबनदादांना पाहावे लागले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com