

Solapur, 26 July : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्या धक्क्यातून उद्वव ठाकरे अजूनही सावरलेले नाही तोच सोलापूरमधील ठाकरेंच्या आमदारांची सत्ताधारी विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींशी जवळीक वाढताना दिसत आहे. आषाढी वारीच्या धावपळीच्या दौऱ्यातही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वेळ दिल्याचे पुढे आले आहे.
ओमराजे निंबाळकर, प्रताप जाधव यांच्यासह तब्बल सहा खासदारांनी नुकतीच उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत. तो ठाकरेंना मोठा धक्का मानला जात होता. कारण भाजप आणि मोदींच्या शक्तीशाली सत्तेविरोधात लढून ठाकरेंनी सहा खासदारांना निवडून आणले होते. मात्र, त्यांनी ठाकरेंना सोडून सत्तेच्या वळचणीला जाणे पसंत केले आहे.
खासदारांनंतर ठाकरेंचे आमदारही पक्ष सोडणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ती चर्चा सध्या थंडावली असली तरी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची सत्ताधारी पक्षाशी विशेषतः भाजपशी जवळीक वाढताना दिसत आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मदतीसाठी आमदार सोपल यांना फोन केला होता. त्याचवेळी महाविकास आघाडीत असूनही त्यांनी विधान परिषदेत निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतल्याचे दिसून आले नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाच पुढे करत त्यांनी बॅकफूटवर राहणे पसंत केले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सोपल हे हातात हात घेऊन चर्चा करताना दिसून आले. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी निधीवरून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते, त्यामुळे त्यांच्यातील त्या भेटीची चर्चा रंगली होती.
आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला आले होते. त्या धावपळीच्या दौऱ्यातही फडणवीस यांनी आमदार दिलीप सोपल यांना वेळ दिल्याचे दिसून आले. फडणवीस हे सोपल यांच्याशी निवांतपणे चर्चा करताना दिसून आले आहेत. त्यामुळे सोपलांची भाजपशी वाढलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.