मीच राजू शेट्टींना गाडीत घेऊन फिरणार आहे : सतेज पाटलांची मिश्किल टिप्पणी

राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही तर मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही : राजू शेट्टी
Raju shetti-SatejPatil
Raju shetti-SatejPatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्तांचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यांना मदतही मिळालेली नाही. सरकारने वेळकाढूपणा केला तर त्यांना पूरग्रस्तांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही तर मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. (Government should provide immediate relief to flood victims: Raju Shetty)

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीबाबत आज त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची महापालिका निवडणूक कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राजू शेट्टी यांच्या इशाराबद्दल बोलताना ‘मी त्यांनाच गाडीत घेऊन फिरणार आहे,’ असा मिश्किल चिमटा मंत्री सतेज पाटील यांनी काढला.

Raju shetti-SatejPatil
ZP उमेदवारीसाठी सरपंच-उपसरपंचांचा राजीनामा; राष्ट्रवादीवर निवडणुकीपूर्वीच दबाव

या वेळी शेट्टी म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांची मानसिकता वाट पाहात बसण्याची आता राहिलेली नाही. सरकारने एकदाच देणार की नाही हे सांगावे. आणि देणार असतील तर किती रक्कम देणार, याची स्पष्टता करावी. पूरग्रस्तांच्या प्रश्नावर जर सरकारने वेळकाढूपणा करू नये. आठ दिवस आम्ही वाट पाहणार मात्र त्यानंतर मंत्र्यांची गाडी भागात फिरू देणार नाही.’’

Raju shetti-SatejPatil
भाच्यासाठी मामा आला धावून : हर्षवर्धन पाटील-शहा कुटुंबीयांत घडविले मनोमिलन

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या साखर कारखान्यांवरील आरोपाबाबत शेट्टी म्हणाले,‘आम्ही १४ राज्यांतील शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीबाबात सर्वोच्च न्यायालयात साखर कारखान्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. ही रक्कम सुमारे २० हजार कोटी इतकी आहे. सोमय्या यांनी केवळ ठराविक व्यक्तींच्या विरोधातच गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. आम्ही गैरव्यवहाराबाबत बोलताना पक्ष, व्यक्ती, प्रांत यांचा विचार करत नाही. सोमय्या यांनी मुंबई मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराबद्दलही बोलावे.’ यंदा ऊस परिषद होणारच आहे. दसऱ्यानंतर परिषद घेण्याचा आमचा विचार असल्याचे शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

पूरग्रस्तांना मदत देण्यास सरकार बांधिल : पाटील

शेट्टी यांच्या इशाऱ्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अद्याप पाऊस संपलेला नाही. मराठवाड्यात अजूनही पाऊस पडत आहे. राज्यात पंचनामे करण्याचे कामही सुरू आहे. राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. शेट्टी यांनी आता संयम दाखवावा. पूरग्रस्तांना मदत देण्यास सरकार बांधिल आहे.’ त्यांनी मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. मात्र, मी त्यांनाच गाडीत घेऊन फिरणार आहे, असा मिश्किल चिमटाही मंत्री सतेज पाटील यांनी या वेळी काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com