Uddhav Thackeray In Shirdi : 'सरकार आपल्या दारी अन् दुष्काळ उरावरी'; उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला !

Uddhav Thackeray On Shinde Fadnavis Sarkar : 'आस्मानीनंतर शेतकऱ्यांवर सुलतानी कोसळते. '
Uddhav Thackeray In Shirdi
Uddhav Thackeray In ShirdiSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यातील शिर्डीचा दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची प्रश्न, त्यांचा व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी अशी आग्रही मागणीही केली. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray In Shirdi
Maan BJP News : परिक्रमा पंकजा मुंडेंची; चर्चा खासदार-आमदारांच्या अनुपस्थितीची

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावरती आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, पिके करपून गेली आहेत. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती, त्याच्याही नुकसानभरपाईचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ही नुकसानभरपाई कधी मिळेल? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना एक रूपयात विम्याचे थोतांड सरकारने आणलेलं आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ कधी मिळणार? आस्मानीनंतर शेतकऱ्यांवर सुलतानी कोसळते. सरकार आपल्यादारी आणि दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती आहे. "

Uddhav Thackeray In Shirdi
Anil Deshmukh on NCP : शिवसेना आणि आमच्या केसमध्ये मोठी फरक, निकाल आमच्याच बाजूने लागणार !

"सरकार स्वत:चे कार्यक्रम व जाहिराती जोरात करत आहे. जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले तर बरं होईल. मी आज शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागात आलो. मी आणखी दौरे करणार आहे. पाऊस असाच बरसत राहो, कारण शेतकऱ्यांनी माझ्यासमोर व्यथा मांडल्या. त्यांना टँकरचा पुरवठा होत नाही. शेतकऱ्यांना पाणी विकत घ्यावं लागतंय. तरीही पालकमंत्री व सरकारचे मंत्री फिरकत नाहीत. कृषिमंत्री कुठेच दिसत नाहीत, सगळं विचित्र चाललं आहे," असेही ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com