Graduate Constituency Election : नाशिकमधील चित्र स्पष्ट होतेय, सत्यजित तांबेच्या उमेदवारीवर बावनकुळे स्पष्टच बोलले..

Graduate Constituency Election : "दिल्लीपासून गल्लीपासून आमचं सरकार असलं तरी काही बाबतीत आम्ही कमजोर आहोत."
Graduate Constituency Election : Satyajeet Tambe : chandrashekhar Bawankule
Graduate Constituency Election : Satyajeet Tambe : chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून अखेर सस्पेंस संपला आहे. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसने ज्यांना उमेदवारी घोषित केली होती, ते उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज दाखल केला नाही. यामुळे त्यांनी आता माघार घेतल्याचे स्पष्ट आहे. यावेळी सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीसोबतच भाजप आणि शिंदे गटाने आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भाजपच्या लोकांनी अधिकृतपणे अर्ज करावे लागतात. आमच्या कडून काही कार्यकर्त्यांकडून अर्ज केला. पण, त्यांनी एबी फॉर्म मागितला नाही. सत्यजित तांबे आज कोणत्या भूमिकेत आहेत माहित नाही. कुणीही पाठिंबा मागितला नाही," असे बावनकुळे म्हणाले.

Graduate Constituency Election : Satyajeet Tambe : chandrashekhar Bawankule
BJP News : भारत जोडो दरम्यान, दीड हजार काॅंग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये आले ; आता मोठे धक्के..

"दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचं सरकार असलं तरी आम्ही काही बाबतीत, कमजोर आहोत. हे आम्ही मान्य करतो. भाजपने कोणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. सत्यजीत तांबेंनी पाठींबा मागितला तर आम्ही पाठिंबा देवू ," असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. भाजपची कोणतीही ऑफर नव्हती असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाची इच्छा होती. मात्र, एबी फॉम सुधीर तांबे यांना दिला गेला होता. काही तांत्रिक अडचणा आल्या त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला आहे, असेही तांबे म्हणाले.

Graduate Constituency Election : Satyajeet Tambe : chandrashekhar Bawankule
Chandrashekar Bawnkule : उद्धव ठाकरे सोन्याचा चमचा घेवून अन् बदामाचा ज्युस पिवून मोठे झालेले नेते..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com