Gram Panchayat Election Results : आबांच्या पोरानं मैदान मारलं ! सचिन पाटलांनी उडवला धुव्वा !

Maharashtra Gram Panchayat Election Results : सचिन पाटील सरपंच पदावर विराजमान
kolhapur Election
kolhapur Election Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : करवीर तालुक्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलेली ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे शिरोली दुमाला. कारण गोकुळचे माजी जिल्हाध्यक्ष आणि संचालक विश्वास नारायण पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांची पहिल्यांदाच राजकारणात एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे करवीर तालुक्यातील सर्वाधिक लक्ष शिरोली दुमाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले होते. या ठिकाणी आमदार पी. एन. पाटील गटाचे सचिन पाटील विरुद्ध स्थानिक आघाडीचे सरदार पाटील यांच्यात प्रमुख सरपंच पदासाठी निवडणूक झाली.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत स्थानिक आघाडीचे सरदार पाटील यांचा पराभव करत आमदार पी. एन. पाटील गटाचे सरपंच पदाची उमेदवार सचिन पाटील यांनी बाजी मारली. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपला वारस राजकारणात आणल्याने त्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली होती. पहिल्याच प्रयत्नात सचिन पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर शिरोली दुमालात पाटलांचे वर्चस्व कायम राहिल्याचे दिसते.

kolhapur Election
Amol Kolhe: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना दणका; ठाकरे गटाकडे एकहाती सत्ता

सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर

सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निकालावर काटे की टक्कर पाहायला मिळाली. सचिन पाटील हे पहिल्या फेरीत 228 मतांनी आघाडीवर राहिले. दुसऱ्या फेरीत सरदार पाटील यांनी आघाडी घेतली. मात्र, सचिन पाटील यांची 143 मतांची आघाडी राहिली. तिसऱ्या फेरी अखेर सचिन पाटील यांनी पुन्हा आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीअखेर सचिन पाटील यांना 1 हजार 267, तर सरदार पाटील यांना 929 मते पडली. तिसऱ्या फेरीअखेर सचिन पाटील 338 मतांनी आघाडीवर राहिले. चौथ्या फेरीअखेर सचिन पाटील 412 मतांनी आघाडीवर राहिले. पाचव्या फेरीअखेर सचिन पाटील यांनी 517 मतांनी विजय मिळवला.

शिरोली ग्रामस्थांचा विजय

'माझा विजय हा शिरोली दुमाला ग्रामस्थांचा विजय आहे. बहुजन समाजातील प्रत्येक मतदाराने माझ्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. गावाच्या विकासाला प्राधान्य देऊन शिरोली दुमाला गावाला राज्य पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया सचिन पाटील यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिली.

kolhapur Election
Gram Panchayat Result : नांदेडमध्ये दोन गटांत दगडफेक; मतमोजणी करताना राडा...

सचिन पाटील यांचा जाहीरनामा

  • संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण होईल असा डिजिटल गाव.

  • प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.

  • पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी फिल्टर हाऊस चालू करणे.

  • वीज, गटर, रस्ते व प्राथमिक आरोग्य सुविधांना प्राधान्य.

  • जुनी पाण्याची स्कीम (कंबळगोंड) चालू करण्यासाठी प्रयत्न.

  • गावाशेजारील लोकवस्तीमध्ये प्रस्तावित स्ट्रीट लाइटची सोय करणे.

  • गावातील ऐतिहासिक पालेश्वर मंदिराकडे जाणारा प्रलंबित रस्ता.

  • डांबरीकरण करणे व गावतलाव / विहीर सुशोभीकरण व दुरुस्ती करणे.

  • महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न.

शिरोली दुमालात सरपंच पदासाठी झालेले मतदान

4000 पैकी

1)सचिन पाटील:-

पहिली फेरी-530

दुसरी फेरी- 365

तिसरी फेरी-372

चौथी फेरी-313

पाचवी फेरी- 453

2) सरदार पाटील:-

पहिली फेरी-302

सरदार पाटील-450

तिसरी फेरी-177

चौथी फेरी-189

पाचवी फेरी-351

kolhapur Election
Gram Panchayat Election Results : एकच वादा अजितदादा! राज्यात अजित पवार गटाचा डंका; इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना धक्का

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com