Congress News: 'ED, ED क्या है? गॅस सिलिंडर सस्ता मिले तो मोदी भेजते है...ईडी, ईडी!

Rajsthan Assembly Election 2023 : गाण्यातून भाजपकडून ईडीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कारवाईचा पोलखोल केला आहे.
Congress News:
Congress News:Sarkarnama
Published on
Updated on

Rajsthan Election 2023 : आगामी काळात होत असलेल्या राजस्थानातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहाेचला आहे. त्यातच भाजप व काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या प्रचारात सध्या काँग्रेसने आघाडी घेतली आहे.

१९९० मध्ये दिवंगत अभिनेते दिलीपकुमार व राजकुमार यांचा 'सौदागर'हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. त्या सिनेमातील 'इलू, इलू क्या है इलू , इलू ...इलू का मतलब.. आय लव यू' हे गाणे चांगलच गाजले होते. आता याच गाण्याच्या चालीवर आधारित काँग्रेसने 'ईडी, ईडी क्या है ईडी, ईडी ! ईडी का मतलब..बीजेपी अरे मोदीजी और अडानीजी', असे म्हणत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणाच्या केल्या जात असलेल्या अतिरेकाबद्दल चांगलेच धारेवर धरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress News:
Maratha Reservation : विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकेत लिहिलं 'एक मराठा कोटी मराठा'

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. विशेषतः ईडी व एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, त्या ठिकाणी ईडीच्या मार्फत टार्गेट केले जात आहे. यापूर्वीं महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला तर दिल्लीत आम आदमी पक्षाला व राजस्थानात काँग्रेसला लक्ष्य करून कारवाई करण्यात आली.

त्यामुळेच या गाण्यातून भाजपकडून ईडीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कारवाईचा पोलखोल केला आहे. या गाण्यातील बोल मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या ठरले असल्याने भाजपच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

"ईडी, ईडी क्या है ईडी, ईडी !

जब गॅस सिलिंडर सस्ता मिले तो मोदी भेजते है...ईडी, ईडी ! ईडी, ईडी ! ,

जब चिरंजीवी को बेल ना मिले तो भेजते है मोदी ... ईडी, ईडी ! ईडी, ईडी !,

जब मुफ्त मिले दवाँ और मुक्त में मिले बिजली तो भेजते है मोदी, ईडी, ईडी ! ईडी, ईडी ! ... ईडी का मतलब...बीजेपी अरे मोदीजी और अडानीजी",

असे म्हणत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणाच्या केल्या जात असलेल्या अतिरेकाच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

Congress News:
Dr. Chitra Kurhe : एका चुकीमुळं फॉरेन रिटर्न महिलेनं सरपंचपद गमावलं!

राजस्थानात काँग्रेस व भाजपकडून प्रचारात एकमेकांना लक्ष्य केले जात असल्याने प्रचारात मोठी रंगत आली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप केले जात आहेत. एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाही. हेच वातावरण आता प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत असणार आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Congress News:
Junnar News: जुन्नर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार प्रमुखाच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com