Solapur BJP
Solapur BJPSarkarnama

Bjp Politic's : भाजप निवडणूक कार्यालयाच्या उद्‌घाटनाकडे पालकमंत्र्यांची पाठ; सोलापूर चर्चेला उधाण

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपकडून झाला असला, तरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची गैरहजेरी आणि अल्प उपस्थितीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Published on

Solapur, 04 January : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. भाजपच्या महापालिका निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन गोरेंच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, पालकमंत्री त्या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत, तर सभागृहात अवघे 30 च्या आसपासच कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटपर्यंत कार्यक्रमाला गर्दी झालीच नाही. गोरे हेही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत, त्याची सोलापुरात खमंग चर्च होती.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या १०२ जागांवर भाजपने आपले उमदेवार उभे केले आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री गोरे यांच्या खांद्यावर आहे. त्यादृष्टीने भाजपकडून नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सोलापुरात भाजपच्या निवडणूक कर्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते होणार होते.

भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या हस्ते होणार असे सांगण्यात आले होते. मात्र, पालकमंत्री या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. तसेच सोलापूर शहरात तीन आमदार असूनही या कार्यक्रमासाठी तेही आले नव्हते. महापालिकेचे उमेदवारही एखादा दुसराच उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन न आल्यामुळे शेवटी वाट पाहून भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी ज्येष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, मोहिनी पत्की, सुधा आळीमोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. सभागृहात शंभर खुर्च्या मांडलेल्या असताना कार्यक्रमासाठी मोजकेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सभागृहात भाजप कार्यकर्त्यांपेक्षा पत्रकारांचीच संख्या जादा असल्याचे दिसून आले. याशिवाय व्यासपीठावर केवळ नऊच पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भाजपमधील रुसवे-फुगवे अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री गोरे आज सोलापूर शहरात होते, तरीही निवडणूक कार्यालयाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते.

सोलापूर शहराच्या विविध भागात कार्यालयांची उद्‌घाटने आणि विविध कार्यक्रम असल्याने निवडणूक कार्यालयाच्या उद्‌घाटनाला गर्दी कमी होती, असे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र, खुद्द पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन होणार असे सांगण्यात आले होते, तरीही कार्यक्रमासाठी गर्दी झाली नव्हती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com